Tuesday, May 30, 2023
घर मानिनी पिरियड मधील पोटदुखी पासून 'हा' पदार्थ करेल सुटका

पिरियड मधील पोटदुखी पासून ‘हा’ पदार्थ करेल सुटका

Subscribe

अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान किंवा मासिक पाळी येण्याआधी पोट दुखीची समस्या जाणावते. याला पीरियाड्स क्रँप्स देखील म्हटलं जातं. मासिक पाळीचा दरम्यान होणाऱ्या पोटदुखीमुळे अनेक वेळा थकवा जाणतो. काहींना डोके दुखी, पाठ दुखी आणि कंबर दुखीची समस्या देखील जाणावते.

Menstrual Cramps: 5 Tips for Getting Period Pain Relief | Houston Methodist On Health

- Advertisement -

मासिक पाळी दरम्यान होणारी पोटदुखी जर कमी करायची असेल तर तुम्ही या घरगुती टिप्स फॉलो करू शकता. पोटाच्या खालच्या भागात दुखत असेल तर प्रथम गरम पाण्याच्या पिशवीनं पोट शेका. जर गरम पाण्याची पिशवी नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये टॉव्हेल भिजवून तो टॉव्हेल पोटावर ठेवून पोट शेकू शकता.

याव्यतिरिक्त मासिक पाळी दरम्यान आल्याचे सेवन केल्यास शरीराला आराम मिळतो. आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आलं हे सर्वात उपयुक्त मानले जाते. बायोएक्टिव घटकांनी आणि पोषक तत्वांनी संपूर्ण असलेले आले हे माणसाच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी लाभदायक असतं.

- Advertisement -

Ginger: Health benefits and dietary tips

  • मासिक पाळीदरम्यान आल्याचे सेवन केल्यास मळमळ होण्यापासून आराम मिळतो.
  • पिरियड्स चालू असताना सतत वाटणारी मळमळ आल्यापासून दूर होऊ शकते.
  • आल्याच्या चहापासून पोटाला आराम मिळतो.
  • आलं मध्ये असलेले व्हिटॅमिन शरीराला पोषण देते.
  • आल्याच्या पावडरचं सेवन केल्याने या त्रासातून काही प्रमाणात सुटका मिळते.
  • पिरियड्स मध्ये आल्याची पावडर खावी. जेणे करून ओटीपोटात दुखणे, स्नायू दुखणे आणि अतिरक्तस्त्रावापासून आराम मिळतो.
  • को-या चहात लिंबू पिळून प्यायल्यानेही मासिक पाळीतील वेदना कमी होऊ शकतात.
  • अनियमित मासिक पाळी,पोटदुखीसाठी आले टाकून उकळलेले पाणी दिवसातून तीनवेळा घ्यावे. यातून खूप फरक पडतो.

हेही वाचा:

सावधान! व्हिटॅमिन्सच्या कमतरतेची ‘ही’ असू शकतात लक्षणं

- Advertisment -

Manini