घरदेश-विदेशDCGI : 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना 'हे' कफ सिरप देऊ नका,...

DCGI : 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ‘हे’ कफ सिरप देऊ नका, DCGI ने सर्व राज्यांना पाठवले पत्र

Subscribe

Cough Syrup : भारताची आरोग्य नियामक संस्था असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थांनी (CDSCO) (Central Drugs Standard Control Organization) चार वर्षांखालील मुलांसाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या अँटी-कोल्ड औषधांच्या संयोजनावर अधिकृतपणे बंदी घातली आहे. चार वर्षांच्याखालील मुलांसाठी सर्दी आणि खोकल्याचं कफ सिरप वापरण्यावर बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत. 18 डिसेंबर ला DCGI (Drugs Controller General of India) ने सर्व राज्यांना पत्र लिहलं आहे. या पत्रातून क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन या दोन औषधांच्या कॉकटेलचा वापर करून तयार केलेल्या सिरपच्या पॅकेजिंगवर लेबल लावण्यास सांगितले आहे.

कप सिरपच्या वापरामुळे जगभरात 141 मुलांचा मृत्यू झाल्यामुळे ही बंदी घालण्यात आली. मॅलेट आणि फेनिलेफ्राइन या दोन औषधांच्या मिश्रणातून तयार केलेलं कफ सिरफ किंवा गोळ्या सर्दीच्या किंवा खोकल्याच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापर करण्यात येतो. यो दोन्ही औषधांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कप सिरपचे लेबलिंग तात्काळ अद्ययावत करण्याच्या सूचना औषध कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

DCGI ने राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, क्लोरफेनिरामाइन मॅलेट आयपी 2mg + फेनिलेफ्रिन HCI IP 5mg ड्रॉप/ml चा निश्चित डोस संयोजन प्राध्यापक कोकाटे यांच्या समितीनं तर्कसंगत घोषित केल आहे. समितीच्या शिफारशीच्या आधारावर, या कार्यालयानं मंजूर FDC (Fixed-dose combination)च्या धोरणात्मक निर्णयानुसार, 17 जुलै 2015 रोजी एफडीसी विषयाचं उत्पादन आणि विपणन चालू ठेवण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी केलं गेलं आहे. अर्भकांसाठी अप्रमाणित एंटी-कोल्ड ड्रग फॉर्म्युलेशनच्या जाहिरातीनंतर या गोष्टी समोर येत आहेत. या विषयांवर चर्चा झाली. विषय तज्ज्ञ समितीची (SEC- पल्मोनरी) 6 जून, 2023 रोजी बैठक झाली, ज्यामध्ये FDC म्हणून Chlorpheniramine Maleate IP 2mg + Phenylephrine HCl IP 5mg Drop/ml च्या वापराबाबत समितीसमोर चर्चा करण्यात आली आहे. “समितीनं शिफारस केली आहे की, FDCs 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वापरू नयेत आणि त्यानुसार कंपन्यांनी लेबल आणि पॅकेज इन्सर्टवर या संदर्भात चेतावणींचा उल्लेख करावा,” असं पत्रात म्हटलं आहे.

या संदर्भात एका वृत्तसंस्थेनं दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयाचे ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. धीरेन गुप्ता (Dr. Dheerendra Gupta)यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, “Chlorpheniramine maleate + phenylephrine hydrochloride ची शिफारस 1 वर्षांखालील मुलांसाठी केली जात नाही. 2 ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. जरी हे औषध लिहून दिलेलं असलं तरी ते अत्यंत कमी डोसमध्ये वापरावं आणि अल्प कालावधीसाठी कारण त्यामुळे मूर्च्छित होण्यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. एसईसीच्या शिफारशीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे आणि सर्व उत्पादकांना लेबल आणि पॅकेज इन्सर्ट/प्रमोशनवर एफडीसी 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वापरू नये अशा चेतावणींचा उल्लेख करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -