घरमहाराष्ट्रनांदेडच्या घटनेवर चित्रा वाघ यांचे अजब विधान, "गरोदरपणात सरकारने दिलेल्या गोळ्या महिला...

नांदेडच्या घटनेवर चित्रा वाघ यांचे अजब विधान, “गरोदरपणात सरकारने दिलेल्या गोळ्या महिला घेत नाही म्हणून…”

Subscribe

मुंबई : गरोदरपणात सरकारने दिलेल्या गोळ्या, औषधे माता घेत नाही. यामुळे कुपोषित बालकांचा जन्म होतोय, असे संतापजनक विधान भाजपच्या नेत्या चित्र वाघ यांनी नांदेडच्या घटनेवरून केले आहे. चित्र वाघ यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. नुकतेच नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवसात 31 रुग्णांचा मृत्यूने एकच खळबळ माजली होती. यात 12 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड प्रकरणी चित्रा वाघ म्हणाल्या, “जिथे लहान बालकांना पेटीत ठेवतात ना. तिथे खूप आया बसल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले, मी तुम्हाला त्यांचा देखील व्हिडीओ पाठवते. सरकारकडून गोळ्या दिल्या जातात, आम्ही खात नाही. पोषण आहार दिला जातो, पण आम्ही कधी खातो, कधी नाही खात. डॉक्टरांनी सांगितले की, या गोळ्या घायाच्या आहेत. या गोळ्या घेतल्या असत्या तर मुले चांगली असते. गोळ्याचे सेवन केल्याने तुमची मुले तंदुरुस्त असते आणि बाळ तुमच्या मांडीवर खेळत असते. हे त्यांना आम्ही सांगितले”, चित्र वाघ ऐवढ्यावर बोलून थांबल्या नाही.

- Advertisement -

हेही वाचा – नांदेड शासकीय रुग्णालयात ‘मृत्यू तांडव’ सुरूच, ‘या’ धक्कादायक कारणामुळे झाला चिमुकलीचा मृत्यू

…गिळायला देऊ शकत नाही

- Advertisement -

चित्र वाघ पुढे म्हणाल्या, “आपण औषधे आणि पोषण आहार पुरवू शकतो. पण आपण गिळायला देऊ शकत नाही. आशा सेविका ज्या तिकडे जातात. विटामिन आणि आयनच्या गोळ्या देतात. त्या गोळ्या या गर्भवती माता घेतात की, नाही. इथून आपल्याला बघण्याची गरज आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -