घरमहाराष्ट्रऔषध खरेदीवरून अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले - "हाफकीनला..."

औषध खरेदीवरून अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले – “हाफकीनला…”

Subscribe

सरकारने 2022-23 या काळात एक रुपयांचीही औषध खरेदी केली नसल्यामुळे राज्यात औषध तुटवडा निर्माण झाला असून एकप्रकारे सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आहे.

मुंबई : मागील आठवड्यात नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर पुन्हा काही तासांत आणखी काही जणांचा या रुग्णालयात मृत्यू झाला. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातही 24 तासांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. ज्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरले. औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलेले असतानाच सरकारने 2022-23 या काळात एक रुपयांचीही औषध खरेदी केली नसल्यामुळे राज्यात औषध तुटवडा निर्माण झाला असून एकप्रकारे सरकार जनतेच्या जीवाशी खेळतेय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज (ता. 10 ऑक्टोबर) त्यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत सरकारवर केला आहे. (Ambadas Danve made a serious allegation against state government for purchasing Medicine)

हेही वाचा – मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना डिवचले, म्हणाले – “तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर…”

- Advertisement -

आज झालेल्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाला 2022-23 मध्ये 108 कोटी रुपयांच्या औषध खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र त्यातील फक्त 50 कोटी रुपयेच हाफकीनला देण्यात आले आहेत. यामुळे पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय कोणतीही कंपनी औषधे खरेदी करणार नाही, अशी भूमिका हाफकीन संस्थेने घेतल्याची माहिती हाफकीनच्या अधिकारी वर्गासोबत घेतलेल्या बैठकीत मिळाल्याचे दानवे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तर, सरकार 150 कोटी रुपये जाहिरातीसाठी खर्च करते. मात्र औषध खरेदीसाठी पैसे देत नाही. सरकार आपल्या दारीच्या माध्यमातून मृत्यू घरोघरी पाठवते की काय? असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित करण्यात आला आहे.

तसेच, आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमणुकीला दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या अधिकाऱ्यावर गुन्हा नोंद होतो व त्याच्या विरोधात नोटीस काढूनही सरकारला जुमानत नाही, अशा अधिकाऱ्याच्या हाती राज्याची कायदा व सुव्यवस्था जाता कामा नये, अशी आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. तर, शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम मिळावी, यासाठी या आठवड्यभरात विमा कंपन्यांच्या दारात जाऊन जाब विचारणार अशी भूमिका शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतली असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -