घरमहाराष्ट्र"याच आरोग्य यंत्रणेने कोरोना काळात केले उत्तम काम", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

“याच आरोग्य यंत्रणेने कोरोना काळात केले उत्तम काम”, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

Subscribe

मुंबई : राज्याच्या याच आरोग्य यंत्रणेने कोरोना काळात उत्तम काम केले होते. पण आता राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीन-तेरा वाजलेले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. नांदेड रुग्णालयातील घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री या सर्वांवर हल्लाबोल केला आहे.

नांदेड घटनवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज मात्र मी अस्वथ आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत. ते बघितल्यानंतर खरोखर संतप होतो. जगभरात जेव्हा कोरोनाचे संकट होते. तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते. मी मुख्यमंत्री होतो आज मी मुख्यमंत्री नाही. सरकार महाविकास आघाडीचे नाही. महाराष्ट्र तोच आहे आणि आरोग्य यंत्रणा देखील तिच आहे. ज्या आरोग्य यंत्रणेने जग व्यापून टाकले. संकट त्या संकटाचा यशस्वीपणाने सामना केला होता. त्याच महाराष्ट्राची दुर्दशा हे सरकार बदलल्यानंतर चवाट्यावर आलेली आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – निर्दयी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, ठाकरे गटाची मागणी

कोरोना काळात औषधांचा तुटवडा नव्हता

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “कोरोनाच्या काळात मुंबई मॉडेल, महाराष्ट्र याच यंत्रणेने हेच डॉक्टर होते. हेच डीन, परिचारी, वॉर्डबॉय देखील हेच होते. या सर्वांनी जीवाची बाजी लावून रुग्णांची सेवा केली आणि कोरोनावर इलाज नसताना सुद्धा जी काही औषधे वपारली जात होती. ती औषध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचण्याचे काम या यंत्रणेने केले होते. महाराष्ट्र हे पहिले असे राज्य आहे. दुर्गम भागात ड्रोन देखील औषधांचा पुरवठा केला गेला होता. मी स्वत: नंदुरबारच्या एका लसीकरण केंद्राला भेट दिली होती. तिथे देखील लसीकरण झाले होते कुठेही औषधांचा आणि लसीचा तुटवडा नव्हता. डॉक्टर व्यवस्थित होते. कोरोना काळात अनेक डॉक्टर आणि परिचारीकांचा मृत्यू झाला. त्यावेळी हे सर्व जण कुठेही मागे हटले नाही. तर योध्यासारखे लढले आणि आज त्या योद्ध्यांना आज बदनाम केले जात आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – तुम्हाला संवेदनाही नाहीत हेही दाखवून दिले…, भाजपाचा राऊतांसह ठाकरेंवर पलटवार

नांदेडच्या घटनेची जबाबदारी कोणी घेतली नाही

“ठाणे, कळव्याचे रुग्णालय असेल, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेडचे शासकीय रुग्णालय आहे. या रुग्णालयातील घटनांना जबाबदार कोण. मला संताप ऐवढ्याच गोष्टींचा आलेला आहे की, या घटनेंची जबाबदारी कोणी घेत नाही. यावेळी राज्यात हे संकट आले. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री कुठे आहेत”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर केला आहे.

हेही वाचा – ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातील रेडा आता असता, तर… चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका

डीनला धमकवण्यासाठी सदोमनुष्यवदाचा गुन्हा दाखल का?

नांदेडच्या डीनवर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. जर कोणी गुन्हेगार असेल, तर त्याला शिक्षा द्यावी. पण नांदेडच्या डीनवर सदोषमनुष्यवदाचा गुन्हा का? दाखल केला गेला. कळवा, छत्रपती संभाजीनगर, नागपूरच्या रुग्णालयात देखील बळी गेलेत आहेत. हा योगायोग आहे का? ज्या डीनला गद्दार खासदाराने बाथरूम स्वच्छ करायला लावले. यानंतर त्या खासदारावर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला गेला. मग डीनला धमकवण्यासाठी सदोमनुष्यवदाचा गुन्हा दाखल का?, असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -