Thursday, May 16, 2024
घरमानिनीRelationshipआईच्या पोटात असणाऱ्या बाळालाही ऐकायला आवडतात गोष्टी

आईच्या पोटात असणाऱ्या बाळालाही ऐकायला आवडतात गोष्टी

Subscribe

लहान मुलांना झोप लागावी म्हणून आजी, आई गोष्टी सांगायचे. बालपणीच्या कथा आणि आजीच्या बाजूला झोपण्याचा अनुभव फार सुंदर असायचा. ज्या परिवारातील मुलांना रात्री झोपताना गोष्टी सांगितल्या जातात त्यांना लहानपणापासूनच पुस्तक वाचवण्याची आवड निर्माण होते. या सवयीला बेड टाइम रीडिंग असे म्हटले जाते. खरंतर रात्री झोपण्यापूर्वी बेडवर झोपून गोष्टी वाचल्याने लहानांनाच नव्हे तर मोठ्यांना सुद्धा फायदा होतो.

जेव्हा एक मुलं एकच गोष्ट सतत वाचतो तेव्हा त्याला पुस्तकांचे जग कळू लागते. त्या पुस्तकाला स्पर्श करणे, त्यामधील रंगीत फोटो पाहण्यात त्यांना फार मजा येते. मात्र तुम्हाला माहितेय का, गर्भातील बाळाला सुद्धा तुम्ही वाचत असलेल्या गोष्टी ऐकायला आवडतात.

- Advertisement -

गोष्टी समजून घेणे लहान मुलांसाठी शक्य आहे. म्हणजेच जेव्हा आईच्या गर्भात बाळ असते तेव्हा त्याला गोष्टी ऐकणे फार आवडते. प्रेग्नेंट वुमनला जर एखादी कविता किंवा गाणे ऐकवले तर गर्भातील बाळं सुद्धा अॅक्टिव्हिटी करु लागते.

- Advertisement -

गर्भातील बाळाचा मेंदू ती भाषा समजून घेण्यासाठी प्रयत्न करतो. जन्मानंतर बाळाला हे कळणे सोप्पे होते की, शब्द कसे बोलले जातात. प्रेग्नेंसीमध्ये जर तुम्ही पुस्तकं वाचली तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याची आपल्या भाषेवर पकड बसणे सोप्पे होते.

मुलांना पुस्तकं वाचून दाखवली तर त्यांची आकलनशक्ती वाढली जाते. त्यांना नव्या गोष्टी जाणून घेण्याची प्रत्येक वेळेस उत्सुकता असते. या व्यतिरिक्त मुलांमधील स्क्रिन टाइम कमी करण्याचा सुद्धा हा एक बेस्ट पर्याय आहे.


हेही वाचा- Breast feeding करणाऱ्या मातांनी करावे ‘या’ पदार्थांचे सेवन

- Advertisment -

Manini