Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenस्वयंपाक गॅसची बचत करायची? 'या' ट्रिक ठरतील फायदेशीर

स्वयंपाक गॅसची बचत करायची? ‘या’ ट्रिक ठरतील फायदेशीर

Subscribe

दिवसेंदिवस स्वयंपाक गॅसची किंमत ही वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत गृहिणींना स्वयंपाक घरात काम करणे कठीण झाले आहे. त्यामुळे जितके शक्य होईल तितके कमी गॅस वापरण्याचा प्रयन्त घराघरात केला जात आहे. काही पदार्थ शिजविण्यासाठी वेळ लागतो. ज्याने गॅस जास्त प्रमाणात वापरला जातो आणि परिणामी गॅस २ ते ३ आठवड्यातच संपतो. तुम्ही सुद्धा या समस्येने हैराण झाल्या असाल तर ही बातमी पूर्ण वाचा.

स्वयंपाक गॅसची बचत करण्यासाठी ‘या’ ट्रिक ठरतील फायदेशीर

No place at the table. Indian women, food, and eating | Food | Al Jazeera

नॉनस्टिक पॅन भांडी वापरा – 
अन्न शिजविण्यासाठी तुम्ही नॉनस्टिक पॅन वापरा. नॉनस्टिक पॅन मध्ये अन्न लवकर तयार होते. तसेच तेलही कमी लागते. त्यामुळे तुमचा गॅसही वाचेल आणि तेलही कमी लागेल.

प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवा –
स्वयंपाक करण्यासाठी प्रेशर कुकर बेस्ट ऑप्शन आहे कारण प्रेशर कुकर मध्ये लवकर अन्न शिजते आणि गॅसचा वापर कमी होतो. अशावेळी तुम्ही डाळी आणि भात शिजविण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करा.

झाकून अन्न शिजवा –
जर अन्न झाकून शिजविले नाही तर अन्न शिजायला वेळ लागतो. त्यामुळे पदार्थ शिजविताना अन्न झाकूनच शिजवा याने पदार्थ चवदार बनतो शिवाय गॅसही कमी लागतो.

फ्रिजमधून पदार्थ थेट बाहेर काढून शिजवू नका –
दूध, भाजी किंवा फ्रिजमध्ये ठेवलेला कोणताही पदार्थ थेट गॅसवर गरम करायला ठेऊ नका. किमान १ ते २ तास आधीच पदार्थ बाहेर काढून ठेवा. याने पदार्थ रूम टेम्परेचरवर येईल. याने पदार्थ गरम करायला जास्त वेळ लागणार नाही.

फ्लेम कमी ठेवा –
काही जणांचा असा समज असतो की, फ्लेम जास्त ठेवल्याने अन्न पदार्थ लवकर शिजतात. पण, अशाने तुमच्या पदार्थांची चव बिघडू शकते. शिवाय गॅसही वाया जातो. त्यामुळे मध्यम फ्लेमवरच अन्नपदार्थ शिजवा.


हेही वाचा ;  Kitchen Tips : गृहिणींसाठी हटके टिप्स

- Advertisment -

Manini