घरमनोरंजनलेकीच्या वाढदिवशी प्रियंका चोप्राने मंदिरात केली पूजा; फोटो व्हायरल

लेकीच्या वाढदिवशी प्रियंका चोप्राने मंदिरात केली पूजा; फोटो व्हायरल

Subscribe

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा प्रोफेशनल आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनेकदा प्रियंकाचे तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच, आता प्रियंकाने मालती मेरीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त मंदिरात पूजा केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

मालती मेरीच्या वाढदिवसानिमित्त प्रियंकाने केली पूजा

- Advertisement -

 

मालती मेरीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त प्रियंकाने मंदिरात पूजा केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील एका फोटोमध्ये मालती मेरी, प्रियंका, निक जोनस आणि प्रियंकाची आई मंदिरात देवाचे दर्शन घेताना दिसत आहेत.

- Advertisement -

तर दुसऱ्या एका फोटोत मालती मेरीच्या गळ्या फुलांचा मोठा हार घातलेला दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत मालती गुलाबी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे शिवाय यावेळी तिने डोळ्यांवर गॉगल देखील लावला होता.
या लूकमध्ये मालती खूपच क्यूट दिसत आहे. हे फोटो पाहून चाहते मालतीचं आणि प्रियंकाचं खूप कौतुक करत आहेत.

‘या’ चित्रपटात दिसणार प्रियंका चोप्रा

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरीजमुळे चर्चेत होती. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.


हेही वाचा : Photo : मौनी रॉयचा देसी लूक पाहा…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -