घरदेश-विदेशLok Sabha 2024 : मोदी सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी, ठाकरे...

Lok Sabha 2024 : मोदी सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी, ठाकरे गटाचा घणाघात

Subscribe

भाजपाला पुन्हा सत्ता म्हणजे पुढील पाच वर्षे देश लुटण्याची गॅरंटी. भाजपाच्या जाहीरनाम्यावर 2014 आणि 2019मध्ये लोकांनी विश्वास ठेवला, मात्र आता 2024मध्ये विश्वास ठेवता येणार नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राज्य पुन्हा आले तर देशात पुन्हा निवडणूक होणार नाहीत. लोकशाही आणि संविधान नष्ट केले जाईल. मोदी यांचे सरकार म्हणजे हुकूमशाहीची शंभर टक्के गॅरंटी असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Lok Sabha Election 2024: Thackeray group attacks Modi’s alleged dictatorship)

युवा, महिला, शेतकरी, गरीबांना सशक्त करणारा, समान नागरी कायदा लागू करणारा, ‘एक देश, एक निवडणूक’ अशी मोदी गॅरंटी देणारा भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. त्यात नवे असे काहीच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात जुनीच बाटली आणि जुन्याच दारूचा बार उडवला आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : शेतकरी सशक्त होऊ नये यासाठीच खटाटोप, ठाकरे गटाकडून भाजपा जाहीनाम्याचे पोस्टमार्टम

महागाईत होरपळलेल्या जनतेला दिलासा नाही. 2014 साली गॅस सिलिंडर 400 रुपये होते. 2019 ला ते 1300 रुपये इतके महाग झाले आणि आता मोदी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की, आम्ही घरापर्यंत पाइपलाइनने गॅस पोहोचविणार आहोत. मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे चालूच ठेवण्याची घोषणा मोदी यांनी केली. किमान 80 कोटी लोकांना माणशी पाच किलो धान्य फुकट देणे म्हणजे 80 कोटी लोकांना पुढची पाच वर्षे गरीब आणि गुलाम ठेवण्याची मोदी गॅरंटीच आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे.

- Advertisement -

‘रामराज्या’चा पत्ता नाही. जगभरात ‘रामायण उत्सव’ हे ढोंग मात्र सुरू आहे. मणिपुरातील हिंसाचार संपवून तेथे शांतता आणण्याची गॅरंटी मोदी देत नाहीत. लडाखमध्ये चिनी सैन्य घुसले आणि भारतीय भूमीवर ताबा मिळवला, ते चिनी सैन्य हटविण्यासाठी 56 इंची छाती पणास लावण्याची गॅरंटी नाही, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जाहीरनाम्यात जुनीच बाटली आणि जुन्याच दारूचा बार उडवला, ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

मोदींचे उमेदवार जागोजाग सांगतात की, देशाचे संविधान बदलण्यासाठी त्यांना चारशे खासदार निवडून आणायचे आहेत. हे सर्व रोखावेच लागेल. युवा, शेतकरी, महिलांना सन्मानाने जगण्याची हमी नसलेला भाजपाचा जाहीरनामा म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. शिक्षण, आरोग्याच्या योजना कागदावरच राहतील, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

भाजपाला पुन्हा सत्ता म्हणजे पुढील पाच वर्षे देश लुटण्याची गॅरंटी. भाजपाच्या जाहीरनाम्यावर 2014 आणि 2019मध्ये लोकांनी विश्वास ठेवला, मात्र आता 2024मध्ये विश्वास ठेवता येणार नाही. भाजपाचा जाहीरनामा आणि मोदींची गॅरंटी म्हणजे भारतीय जनतेवर ‘ड्रोन हल्ला’च असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -