घरदेश-विदेशLok Sabha 2024 : शेतकरी सशक्त होऊ नये यासाठीच खटाटोप, ठाकरे गटाकडून...

Lok Sabha 2024 : शेतकरी सशक्त होऊ नये यासाठीच खटाटोप, ठाकरे गटाकडून भाजपा जाहीनाम्याचे पोस्टमार्टम

Subscribe

आता 2024च्या जाहीरनाम्यात मोदी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा घेऊन आले. शेतकऱ्यांची ही थट्टाच आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या घोषणांचा धुरळा पुन्हा उडवला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणारे मोदी निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचा कैवार घेतात, पण निवडणूक जिंकताच शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसतात. प्रभू श्रीरामांसाठी सर्वत्र सजावट करतात. रांगोळ्यांचे सडे पाडतात, पण शेतकऱ्यांच्या वाटेत खिळ्यांच्या रांगोळ्या टाकून अधम कृत्य केले जाते. शेतकरी सशक्त होऊ नये यासाठीच हा खटाटोप आहे, असा हल्लाबोल करत ठाकरे गटाने भाजपाच्या जाहीरनाम्याचे पोस्टमार्टम केले आहे. (Lok Sabha Election 2024: Thackeray group attacks BJP on farmers issue)

शेतकरी सन्मान निधीअंतर्गत दहा कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा मोदी यांनी केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘डबल’ म्हणजे दुप्पट करण्याची घोषणा मोदी यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतही केलीच होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झालेच नाही. उलट जे उत्पन्न तुटपुंजे होते, तेदेखील कमी झाले. 2014च्या आधी शेतकरी कष्टाचे खात होते. मोदी काळात तो गुलाम आणि परावलंबी झाला, अशी जहरी टीकाही ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जाहीरनाम्यात जुनीच बाटली आणि जुन्याच दारूचा बार उडवला, ठाकरे गटाचे भाजपावर टीकास्त्र

आता 2024च्या जाहीरनाम्यात मोदी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा घेऊन आले. शेतकऱ्यांची ही थट्टाच आहे. किमान हमीभाव आणि काळ्या कृषी कायद्यांविरुद्ध शेतकरी दिल्लीकडे निघाले तेव्हा त्यांना रोखण्यासाठी हरयाणा-दिल्लीच्या सीमेवरील रस्त्यांवर खिळे ठोकण्यात आले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून निदर्शनास आणले आहे.

- Advertisement -

लोकांना गुलाम ठेवण्याची मोदी गॅरंटी

महागाईत होरपळलेल्या जनतेला दिलासा नाही. 2014 साली गॅस सिलिंडर 400 रुपये होते. 2019 ला ते 1300 रुपये इतके महाग झाले आणि आता मोदी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगतात की, आम्ही घरापर्यंत पाइपलाइनने गॅस पोहोचविणार आहोत. मोफत रेशन योजना पुढील पाच वर्षे चालूच ठेवण्याची घोषणा मोदी यांनी केली. किमान 80 कोटी लोकांना माणशी पाच किलो धान्य फुकट देणे म्हणजे 80 कोटी लोकांना पुढची पाच वर्षे गरीब आणि गुलाम ठेवण्याची मोदी गॅरंटीच आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : पैसे घेऊन भ्रष्टाचाऱ्यांना अभय, राऊतांचा भाजपावर आरोप


Edited by – Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -