महिलांनी नेहमी पौष्टीक आहाराचे सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. अशातच नेहमी कोणते पदार्थ खावेत हा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो. महत्वाचा आहार कोणता आणि आहारात कोणते नेमके पदार्थ असायला हवेत या गोष्टी आपल्याला माहित नसतात. तसेच कोणत्या पदार्थापासून कोणते व्हिटॅमिन्स शरीराला मिळतात याची कल्पना आपल्याला नसते. फळभाज्या,पालेभाज्या नियमितपणे खाल्याने देखील शरीराची कमतरता हि जाणवत असते.
माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स D आणि B2 असते. या शिवाय माशांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक (zinc),आर्यन (Iron), आयोडीन (Iodine), मॅग्नेशिअम (Magnesium) आणि पोटॅशिअम (Potassium) यांचे योग्य प्रमाण असते.


महिला या नेहमी सुंदर त्वचेसाठी अनेक उपाय करतात. अशातच त्वचा चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन C आवश्यक असते. काही माशांच्या अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन C असते जे शरीराला गरजेचे आहे. माश्याच्या अंड्यातील व्हिटॅमिन्स c मुळे शरीराला योग्य प्रोटीन मिळते. तसेच त्वचा चांगली होण्यास मदत मिळू शकते.

चेहऱ्याची त्वचा उत्तम राहण्यासाठी अँटी ऑक्सिडंटची गरज असते. तसेच त्वचेसाठी काही अँटीऑक्सिडंट चांगली असतात त्यापैकीच अमिनो अॅसिड, अॅस्कॉर्बिक अॅसिड आणि काही फोनिक कपाऊंडस असतात त्यामुळे त्वचा कायम चांगली राहण्यास मदत होते.

माशांमध्ये असलेलं तेल हे एक प्रकारे सनस्क्रिन आहे. तसेच ते त्वचेवर एक सुरक्षित आवरण तयार करत असते. माशांच्या खाण्यामुळे त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार होते. त्यामुळे त्वचेचे सूर्यापासून संरक्षण करायचे असेल तर अगदी आवर्जून मासे खावेत.

महिलांमध्ये केसगळतीची प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाले आहे. केसांना दाट करण्याचे काम माशांमध्ये असलेले ओमेगा फॅट करत असते. अगदी त्याच पद्धतीने केसांची मूळ घट्ट करण्याचे काम देखील मासे करत असतात. केसांची मूळ घट्ट झाली की केसगळती आपोआप थांबते. यामुळे माश्याचे सेवन केसांसाठी उपयुक्त फायदेमंद आहेत.

महिलांनी प्रामुख्याने बांगडा, सुरमई, कोळंबी, हलवा, पापलेट हे मासे खावेत. तसेच प्रत्यके माशामध्ये अनेक पोषक घटक असतात. अशातच कुठलाही मासा जर आपण खाल्ल्ला तर त्याचे प्रमाण जास्त असणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्ही योग्य प्रमाणात हे मासे खाल्ले तर तुम्हाला त्याचे फायदे नक्की मिळतील.

हेही वाचा :