घरपालघरडहाणू बंदरावर माशांचा पुन्हा तुटवडा

डहाणू बंदरावर माशांचा पुन्हा तुटवडा

Subscribe

यात बोटीवर काम करणारे खलाशी, मासे वाहतूक करणारे , त्याचबरोबर माशांचा बाजार भरल्यानंतर छोट्या-मोठ्या टोपलीमध्ये गावोगावी मासे विक्री करणारे आदिवासी तरुण मासे विक्रेते सुद्धा समाविष्ट असल्याने त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डहाणू:  डहाणू तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवर मच्छीमारांच्या बोटींना स्थिरता आलेले चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यात समुद्र किनारपट्टीत काही भागात मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते . परंतु, सध्या गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मासेमारी बंद असल्याने खवय्यांचे मोठे हाल सुरू आहेत. डहाणू धाकटी गाव , वाढवणं , बोर्डी , आगर , नरपड , झाई, या छोट्या मोठ्या बंदरांवर सर्वत्र मच्छी मारणार्‍या बोटी सध्या किनारपट्टीवर उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या वातावरणात मोठा बद्दल झाल्याने अनेक बोटी समुद्रात जात नसल्याने माशांचा तुटवडा जाणवत आहे.तसेच सध्याच्या काळात मादी मासे हे प्रजनन करत असल्याने मासेमारी कमी प्रमाणात होत आहे .

डहाणूमध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सध्या अनेक दिवसापासून समुद्रकिनार्‍यावर बोटी उभ्या असून आर्थिक व्यवहार कोलमडून मच्छीमारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. डहाणू किनारपट्टी बंदर भागात मोठ्या प्रमाणात मासे मिळत असल्याने समुद्रकिनार्‍यावर अनेक ठिकाणी लहान मासे सुकवले जातात. त्यात बोंबील, मांदेली, सुकट, बांगडा, इत्यादी मासे उन्हात सुकण्याकरिता ठेवले असतात . पण सध्या त्या भागातील शीतगृह सुद्धा ओस पडली आहेत. डहाणू भागात मासेमारीवर अनेक नागरिक आपला उदरनिर्वाह करीत असतात . यात बोटीवर काम करणारे खलाशी, मासे वाहतूक करणारे , त्याचबरोबर माशांचा बाजार भरल्यानंतर छोट्या-मोठ्या टोपलीमध्ये गावोगावी मासे विक्री करणारे आदिवासी तरुण मासे विक्रेते सुद्धा समाविष्ट असल्याने त्यांच्याही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- Advertisement -

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने मासेमारी बंद असून समुद्रात बोटी जात नाहीत त्यामुळे आमची आर्थिक परिस्तिथी खालावली आहे. त्यात खराब वातावरणामुळे समुद्रात मासे देखील मिळत नाहीत . विशेष म्हणजे हा काळ मादी मास्यांचा प्रजनन काळ असल्याने लहान मासे जाळ्यात येऊन उगाच मरून जात आहेत. त्यामुळे आम्ही बोटी समुद्रात नेत नाही.
– जयेश तामोरे (खलाशी/तांडेल- मच्छीमार)

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने मच्छीमारीसाठी बोटी जात नसल्याने आम्हा खवय्यांचे माशांशिवाय मोठे हाल झाले आहेत .आमच्या ग्रामीण भागात सर्वात जास्त सुखी मासळी मच्छी खाली जाते. परंतु आता तुटवडा निर्माण झाला आहे.
– संजय मुकणे ( खवय्या )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -