घरमहाराष्ट्र"शिवसेनेच्या ४० आमदारांना पाडण्यासाठी....'' शहाजीबापू पाटलांचा शरद पवारांबाबत गौप्यस्फोट

“शिवसेनेच्या ४० आमदारांना पाडण्यासाठी….” शहाजीबापू पाटलांचा शरद पवारांबाबत गौप्यस्फोट

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड “काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेच” या डायलॉगने गाजवणारे शहाजी बापू पाटील. शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या एका मोठा गौप्यस्फोटामुळे...

उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर घेतलेली भेट, गेल्या काही दिवसांपासून मविआमध्ये काही मुद्द्यावरून असलेले मतभेद, अजित पवारांशी संबंधित या कंपनीवर आरोपपत्रं दाखल परंतू यात अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांची नावं न देणं, अशात अजित पवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट हे सर्व चित्र येत्या काळात मोठी राजकीय घडामोडीचे संकेत आहे की काय? अशी शंका उपस्थित होतेय. अशात आता शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शरद पवारांबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड “काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेच” या डायलॉगने गाजवणारे शहाजी बापू पाटील. शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते त्यांनी केलेल्या एका मोठा गौप्यस्फोटामुळे…नुकताच त्यांनी शरद पवार यांच्याबाबत एक मोठा गौप्यस्फोट केलाय. शरद पवार हे उद्धव ठाकरेंमार्फत माझं तिकीट कापायच्या तयारीत होते, असं खळबळजनक गौप्यस्फोट शहाजी बापू पाटील यांनी केलाय. यामुळे आता सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे सध्या सांगोला दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी आयोजित केलेल्या आमदार खासदार आपल्या दारी या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. “शिवसेनेचे ४० आमदार पाडण्याची तयारी अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांनी केली होती. शरद पवार गोड बोलून कधी गळा दाबतील हे कळणार नाही. उद्धव ठाकरेंमार्फत माझं तिकीट कापायच्या तयारीत होते, असं शहाजी बापू पाटील यांनी सांगितलं. मात्र आपणही त्यांच्याच तालीमीत तयार झालो आहे, याची आठवण करून दिली, अशी आठवण करून द्यायलाही ते विसरले नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांचा हळूवार प्लॅन सुरु होता. की, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना १० ते १५ जागांपेक्षा जास्त जागा निवडून येऊ द्यायच्या नाहीत. आणि त्याचवेळी दुर्दैवाने उध्दव ठाकरे हे कोरोना आणि आजारपणामुळे मंत्रालयात येत नव्हते. हा धोका सगळा प्रकार आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेनेला पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आमच्या शिवसेनेचं नेतृत्व दिलं. आता आमची शिवसेना वाढणार आणि सगळ्या निवडणुका आम्ही भरघोस मतांनी जिंकणार असा आत्मविश्वासही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. ४० आमदारांना पाडण्याची तयारी अजित पवार आणि थोरातांनी केला होता. मात्र, आम्ही हा महाविकास आघाडीचा डाव उलटवला. यात माझाही समावेश होता असा गौप्यस्फोट शहाजी बापू पाटलांनी केला आहे. कधीही निवडणुका लागल्या तरी आम्ही मैदानात उतरण्यासाठी तयार आहोत असंही ते म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत .आणि मागील ४५ वर्ष ते माझे पालक होते. पण पवार साहेबांच्या राजकारणाचा इतिहास जर बारकाईने पाहिला तर त्यांच्याजवळ जो गेला आहे त्याला त्यांनी राजकारणातून संपवलं असल्याचं लक्षात येईल. त्यांनी छोटे छोटे पक्ष संपवले आहेत. शिवसेनेला ते कधीच बाप करत नसतात. शिवसेनेच्या नेत्यांनी जेवढी पवारांवर टीका केली तितकी अद्याप कोणत्याही पक्षाने केलेली नाही. पण पवार कधी गोड बोलून गळा दाबतील यांना कळणार पण नाही अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केली.

यापुढे बोलताना त्यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांवर होत असलेल्या ५० खोक्यांच्या आरोपावरूनही भाष्य केलंय. यावर बोलताना शहाजी बापू पाटील यांनी थेट उद्धव ठाकरे, अजित पवार यांना इशारा दिलाय. “पाटलाची औलाद आहे. पावणे दोनशे एकर शेती अशी पत्रावळी फेकतात तशी दिली आहे. ५० खोक्याची मला गरज नाही. मी कर्णाची औलाद असून माझं जे काही आहे ते घरात नेण्यासाठी नाहीतर जनतेला देण्यासाठी आहे. मात्र, तु्म्ही तुमच्यासाठी नातवांसाठी, पोरांसाठी आणि सुनांसाठी साठवून ठेवा”, असंही पाटील म्हणाले.

“आता फक्त मैदान लागू द्या. कशाला त्या पोकळ सभा घेऊन खर्च करायचा? या मैदानात आम्ही तयार आहोत. त्यावेळच्या मेळाव्याला मजा आणि भाषणाला मजा आहे.”, असं चॅलेंज देखील यावेळी शहाजी बापू पाटील यांनी दिलंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -