Thursday, May 2, 2024
घरमानिनीHealthथंडीत 'या' सवयींपासून दूर रहा

थंडीत ‘या’ सवयींपासून दूर रहा

Subscribe

एका वयानंतर चेहऱ्यावरील स्किन सैल पडते आणि आपण म्हातारे दिसू लागतो. पण काही महिलांमध्ये अँन्टी एजिंगची समस्या दिसते. तुमच्यासोबतही असे होत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण हे सर्व तुमच्या चुकीच्या गोष्टींमुळे होत आहे. अशातच तुम्ही तुमच्या सवयींमध्ये काही बदल केला पाहिजे.

तर सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे स्किनची अधिक काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. थंडीत आपली स्किन ड्राय होते. पण थंडीत अशा कोणत्या सवयींपासून दूर राहिले पाहिजे हे जाणून घेऊयात.

- Advertisement -

तणावापासून दूर रहा
आजकाल बहुतांश लोक तणावाखाली राहतात. परंचु नेहमीच तणावाखाली राहिल्याने तुमच्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती तणावाचा सामना करतो. परंतु तणाव एका मर्यादेपर्यंत घेणे गरजेचे असते. जर तुम्ही ओव्हर थिंक करत असाल तर टेंन्शन वाढले जाते. याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर थेट पडतो. यामुळे प्रयत्न करा की, तणावापासून दूर रहा.

पुरेशी झोप न घेणे
आजच्या काळात प्रत्येक जण रात्री उशिरापर्यंत जागा राहतो. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहितेय का, तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही तर याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्याचसोबत स्किनवरीह नकारात्मक परिणाम होतो. पुरेशी झोप झाली नाही तर चेहऱ्यावर अँन्टी एजिंगची समस्या दिसून येते. त्यामुळे नेहमीच पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करावा.

- Advertisement -

हेल्दी फूड खाणे
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांची खाण्यापिण्याची सवय बिघडली गेली आहे. परंतु तुम्हाला माहितेय का, याचा थेट परिणाम तुमच्या स्किनवर होतो. अधिक तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यने एजिंगची समस्या होऊ लागते. यापासून दूर राहण्यासाठी हेल्दी डाएट फॉलो करा.

स्मोकिंग करण्याची सवय
जर तुम्हाला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर सावध व्हा. कारण याच कारणास्तव स्किनला पुरेश्या प्रमाणत पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर स्मोकिंग करण्याची सवय असेल तर ती सोडून द्या.


हेही वाचा- थंडीत तूप खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini