घरमहाराष्ट्रभाजपा आमदार प्रवीण दरेकर म्हणतात, फडणवीसांना वगळून मराठा आरक्षण मिळणे सोपे नाही...

भाजपा आमदार प्रवीण दरेकर म्हणतात, फडणवीसांना वगळून मराठा आरक्षण मिळणे सोपे नाही…

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील शासननिर्णय आज, शनिवारी जारी करण्यात आला. मात्र, याआधी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी, फडणवीसांना वगळून मराठा आरक्षण मिळणे सोपे नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – …म्हणून नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन रखडले, आदित्य ठाकरेंची सरकारसह भाजपावर टीका

- Advertisement -

मराठा आरक्षणावरून राज्यातील अनेक भागांत हिंसक आंदोलने झाली. तर दुसरीकडे, मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात दुसऱ्यांदा उपोषण सुरू केले होते. नवव्या दिवशी त्यांचे मन वळविण्यात राज्य सरकारला यश आले. तर, यासंबंधीचा शासननिर्णय (जीआर) जारी करण्यात आला आहे. मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आज, शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात भेट घेतली आणि त्यांनी हा जीआर त्यांच्याकडे सुपूर्द केला.

- Advertisement -

तथापि, उपोषण काळात जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला येण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण त्याचबरोबर त्यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावे, आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – सरकारचा नवीन जीआर मनोज जरांगेंनी स्वीकारला; सर्व मराठ्यांना मिळणार आरक्षण?

या पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर करत आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासपूर्ण गोष्टीतूनच येणाऱ्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळेल. देवेंद्र फडणवीस यांना वगळून मराठा आरक्षण मिळणे सोपे नाही. कारण त्यांना त्याचा अभ्यास आहे, त्यांनी आरक्षण दिले आहे, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -