घरदेश-विदेशदिवाळीपूर्वी देशातील 80 कोटी लोकांना पंतप्रधान मोदींकडून भेट; गरीबांना होणार फायदा

दिवाळीपूर्वी देशातील 80 कोटी लोकांना पंतप्रधान मोदींकडून भेट; गरीबांना होणार फायदा

Subscribe

छत्तीसगड : दिवाळी सणाला अवघे काही दिवस उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीबांना दिलासा दिला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग येथे विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी भाजपा सरकार आता देशातील 80 कोटी गरिबांना मोफत रेशन देण्याची योजना पुढील 5 वर्षांपर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा करताना त्यांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. (Prime Minister Narendra Modi gift to 80 crore people of the country before Diwali The poor will benefit)

हेही वाचा – निकाल देताना समाज अन् लोकांच्या प्रतिक्रियेचा विचार करत नाही; सरन्यायाधीशांनी केले स्पष्ट

- Advertisement -

दुर्ग येथील सभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसने फसवणुकीशिवाय गरिबांना काहीही दिले नाही. काँग्रेस गरिबांचा कधीच आदर करत नाही. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस केंद्र सरकारमध्ये राहिली तोपर्यंत गरिबांच्या हक्काची लूट करत ती आपल्या नेत्यांच्या तिजोरीत ठेवली. हे लक्षात घ्यावे की, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत गरीब नागरिकांना 5 किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळतात. 30 जून 2020 रोजी त्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. सरकारने यापूर्वी डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता ती आणखी 5 वर्षांसाठी वाढवण्यात येणार आहे.

- Advertisement -

छत्तीसगडला लुटण्याची संधी काँग्रेसने सोडली नाही

2000 कोटींचा दारू घोटाळा, 500 कोटींचा सिमेंट घोटाळा, 5000 कोटींचा तांदूळ घोटाळा, 1300 कोटींचा गौठाण घोटाळा, 700 कोटींचा DMF घोटाळा झाला आहे. छत्तीसगडला लुटण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. मात्र राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर अशा घोटाळ्यांची कडक चौकशी करून तुमचा पैसा लुटणाऱ्यांना तुरुंगात पाठवले जाईल, असे आश्वासन मोदींनी उपस्थित लोकांना दिले.

हेही वाचा – …हा विकास नसून जुमलेबाजी आहे, ठाकरे गटाचे मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र

मी रोज 2-2.5 किलो शिव्या खातो – मोदी

पीएम मोदी म्हणाले की, हे काँग्रेसवाले मोदींना रात्रंदिवस शिव्या देतात, मी रोज 2-2.5 किलो शिव्या खातो. पण येथील मुख्यमंत्र्यांनी देशाच्या तपास यंत्रणांना आणि देशाच्या सुरक्षा दलांनाही शिव्या घालायला सुरुवात केली आहे. परंतु मी माझ्या बंधू-भगिनींना सांगू इच्छितो की, मोदी आहेत आणि ते शिव्यांना घाबरत नाहीत, भ्रष्टाचाऱ्यांना जबाबदार धरण्यासाठी जनतेने मोदींना दिल्लीत पाठवले आहे. याठिकाणी गरिबांची लूट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्याच्याकडून प्रत्येक पैशाचा हिशेब घेतला जाईल. पण मी ऐकले आहे की, इथले नेते आम्हाला शांत आवाजात संदेश देत आहेत, आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आम्ही सुद्धा तुमच्याकडे पैसे ठेवू आणि पोलिसांना पाठवू. या धमक्या तुम्ही कोणाला देत आहात? तुम्ही कोणाला घाबरवत आहात? ही जनताच सर्व काही जाणते, असे म्हणत मोदींनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -