Monday, January 20, 2025
Homeमानिनीघरापासून दूर पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहताय? मग फॉलो करा या सेफ्टी टिप्स

घरापासून दूर पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहताय? मग फॉलो करा या सेफ्टी टिप्स

Subscribe

नोकरी किंवा शिक्षणानिमित्त महिला,तरुणींना घरापासून लांब दुसऱ्या शहरात पीजी किंवा हॉस्टेलमध्ये राहावं लागतं. त्यातच देशभऱात महिला अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याने कुटुंबियांना मात्र त्यांची काळजी लागून असते. यामुळे घराबाहेर राहणाऱ्या महिला व तरुणींनी काही सेफ्टी टिप्स फॉलो करणे आवश्यक आहे.

हॉस्टेल किंवा पीजीमध्ये काय काळजी घ्याल?

साधारणत हॉस्टेल किंवा पीजी रुममधून सामान गायब होत असल्याच्या तक्रारी असतात. प्रामुख्याने यात जर तुम्ही किंवा तुमचा रुममेट दरवाजा लॉक न करता बाहेर गेला तर चोरटे हीच संधी साधून तुमचा सामान लंपास करतात. यामुळे ज्यावेळी तुम्ही रुममध्ये एकटे असाल किंवा रुममेट बाहेर गेला असेल तेव्हा रुम लॉक करावा.

इमरजन्सी नंबर कायम डोळ्यासमोर राहील असा लिहून ठेवावा आणि लक्षातही ठेवावा. जसे अॅम्बुलन्स, पोलीस, अग्नीशमन दल, वुमन हेल्पलाईन यांचे फोन किंवा मोबाईल नंबर सेव करुन ठेवावा. तसेच देशभरात चालणारे इमरजन्सी नंबर आहेत. 112, पोलीस 100, वुमन हेल्पलाईन नंबर- 1091 हे देखील मोबाईलमध्ये सेव करून ठेवावेत.

तुमच्या रुममेट्स आणि फ्लोरमेट्सबद्दल माहिती करुन घ्या

तुम्ही ज्या तरुणीबरोबर रुम शेअर करत आहात तसेच तुम्ही ज्या मजल्यावर राहत आहात तेथे बाजूला राहणाऱ्या तरुणींचीही माहिती करुन घ्या. त्यांचा स्वभाव आणि कुटुंबियांची माहिती तुम्हांला असायला हवी. जेणेकरून प्रतिकूल परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला मदत मिळू शकेल.

 

संशयित व्यक्तींना ओळखा
बऱ्याचेवळा तुमच्याबरोबर हॉस्टेल मध्ये पीजी रुममध्ये तुमच्या सोबत राहणारे मित्रच चोरटे असतात. किंवा तुमच्या रुमवर कामनिमित्त ये जा करणाऱ्या व्यक्ती. अशावेळी जर एखाद्याचे वागणे तुम्हांला संशयास्पद वाटले तर सेफ्टीसाठी त्याबदद्ल लगेचच हॉस्टेल वॉर्डन आणि आपल्या कुटुंबाला कळवा.

नियमांचे पालन करा

हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांसाठी तेथील प्रशासनाचे खास नियम असतात. जसे वेळेवर जाणे आणि वेळेवर रुमवर परतणे. त्याची रजिस्टरमध्ये नोंद करणे. हे नियम फॉलो करा.

Manini