घरलाईफस्टाईलPG मध्ये राहणाऱ्या मुलींना करावा लागतो 'या' गोष्टींचा सामना

PG मध्ये राहणाऱ्या मुलींना करावा लागतो ‘या’ गोष्टींचा सामना

Subscribe

पीजी आणि हॉस्टेल मध्ये राहणाऱ्यांचे आयुष्य हे वेगळेच असते. खेळी-मेळीचे तेथे वातावरण असेल तर घरीच राहत असल्यासारखे वाटते. मात्र काही वेळेस हॉस्टेलमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्याच्या बद्दल ऐकून तुम्ही हैराण व्हाल. सध्या हॉस्टल आणि पीजी संबंधित बातम्या सोशल मीडियात खुप व्हायरल होतात. आपण टीव्हीवर ही पाहतो. पण नक्की कसं असत पीजी मधील आयुष्य आणि त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (PG-Hostel girls problems)

-चोरी झालेली ब्रा आणि पँन्टी कैचीने कापली
एका पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणीने सांगितले की, गर्ल्स हॉस्टेल मध्ये सर्वाधिक सामान्य चोरी होण्याचा प्रकार म्हणजे अंडरगार्मेंट्स. पीजीमध्ये राहण्यास आल्यानंतर अवघ्या तीन दिवसातच ब्रा चोरी झाली. त्यानंतरच्या काही दिवसात पँन्टी ही चोरी केली गेली. जेव्हा असे प्रकार घडू लागले तेव्हा कपाटाला टाळं लावलं. पण तरीही ब्रा ही कैचीने कापलेली छतावर मिळाली. याबद्दल विचारले असता काहींनी सांगितले की, येथे हे असेच होते.

- Advertisement -

-पार्टनरसाठी रात्रभर दरवाजा खुला ठेवायची रुममेट
दुसऱ्या एका तरुणीने सांगितले की, जर तुम्ही एखाद्या खोलीत सुरक्षित नसाल तर काय होईल? खरंतर ज्या रुममेट सोबत राहत होत ती एका रिलेशनशिपमध्ये होती. तो नेहमीच तिला भेटण्यासाठी यायचा. एकदा तर तिने त्याच्यासाठी रात्रभर दरवाजा खुला ठेवला होता. तो खोलीत आल्याने फार भीती वाटल्याचे त्या तरुणीने सांगितले. याबद्दल त्या मुलीला विचारले असता तिने उलट धमकावण्यास सुरुवात केली.

- Advertisement -

-शेजारील हॉस्टेलच्या छतावर आला होता
पीजी मधीलच तरुणीने तिचा असा अनुभव सांगितला की, ती ज्या खोलीत रहायची ती खोली छताच्या बाजूला होती. ज्यावेळी दरवाजा उघडला तेव्हा शेजारील व्यक्ती दारासमोर उभा राहिला होता. याबद्दल पीजीच्या मालकांना सांगितले तेव्हा त्या शेजाऱ्याने त्याचे काही सामान पडल्याचे सांगितले. मात्र सत्यात असे काही झाले नव्हते.

-वॉशरुमच्या खिडकीतून डोकावून पाहत होता नोकर
वॉशरुमच्या भींतीवर एक खिडकी होती. ती खिडकी थोडी वरच्या बाजूला होती. त्याकडे कधी लक्ष सुद्धा जायचे नाही. परंतु जेव्हा ती तरुणी वॉशरुममध्ये गेली तेव्हा त्या खिडकीतून नोकर डोकावून पाहत होता. त्यावेळी लगेच कपडे सावरले आणि मालकाला सांगितले.


हेही वाचा- ऑफिसमधील तुमची बॉडी लॅग्वेज चुकीची तर नाही ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -