तरुणींनो, काळजी घ्या! होस्टेलच्या शॉवरमध्ये छुपा कॅमेरा, हार्डडिस्कमध्ये आढळले मुलींचे अश्लिल व्हिडिओ

कॉलेज किंवा नोकरीनिमित्ताने तुम्ही जर होस्टेलमध्ये (Hostel) राहत असाल तर सावधान. कारण गेल्या काही दिवसांपासून होस्टेलच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरे (Spy Camera) सापडण्याचे प्रकार समोर येत आहेत. प्रयागराजमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर होस्टेलचालकाच्या संगणकामध्ये (Computer) मुलींचे व्हिडिओही (Video) सापडले आहेत. त्यामुळे या होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलींमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, या प्रकरणात होस्टेलचालकाविरोधात कारवाई करण्यात येणार असून आणखी कोणाचा सहभाग आहे याचाही तपास करण्यात येत आहे.

प्रयागराजमध्ये कर्नलगंजमधील मेयोहाल चौकाजवळ असलेल्या होस्टेलमध्ये हा प्रकरा घडला. येथे राणाऱ्या आशिष खरे याच्या घराच्या वरच्या मजल्यावर होस्टेल स्वरुपात मुलींना राहण्यासाठी खोल्या दिल्या जातात. या होस्टेलच्या बाथमरुमच्या शॉवरमध्ये गुप्त कॅमेरा (Spy camera in shower) असल्याचे एका मुलीच्या लक्षात आले. शॉवरमधून पाणी कमी येत असल्याने तिने शॉवर हलवून पाहिला. त्यावेळी हा कॅमेरा खाली पडला आणि हॉस्टेलचालकाची खेळी लक्षात आली.

मुलींना या कॅमेऱ्याविषयी माहिती होताच त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखत वेगाने तपासकार्य केल्याने हॉस्टेलचालकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक कम्प्युटर (Computer) आणि नऊ हार्डडिस्क (Harddisc) जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुलींचे अश्लिल व्हिडिओ सापडले आहेत. एवढंच नव्हे तर आशिष खरेकडे अनेक मुलींचे मोबाईल क्रमांक (Mobile Numbers) सापडले असून १०० पेक्षा जास्त मुलींचे पासपोर्ट साईजचे फोटोही (Passport Size Photo) आढळून आले आहेत.

दरम्यान, शॉवरमध्ये कॅमेरा लावणाऱ्या टेक्निशिअनचाही (Technician) शोध घेतला जात आहे. तसेच, या व्हिडिओच्या आधारे कोणाला ब्लॅकमेल (Blackmail) केले गेले आहे का? या अनुषंगानेही तपास सुरू करण्यात आला आहे.