घरमहाराष्ट्रThackeray group : ...म्हणून ही वाट स्वीकारली, बाळासाहेबांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचा...

Thackeray group : …म्हणून ही वाट स्वीकारली, बाळासाहेबांच्या त्या वक्तव्यावर ठाकरे गटाचा खुलासा

Subscribe

मुंबई : शिवसेना काँग्रेसबरोबर म्हणजे महाविकास आघाडीत तसेच इंडिया गटात आहे, पण भाजपाच्या बेइमान राजकारणानेच शिवसेनेला ही वाट स्वीकारावी लागली. भाजपा हा आज भ्रष्टाचारी आणि बेइमानांचा कळप बनला आहे. त्या भ्रष्ट कळपातून शिवसेना बाहेर पडली, हे बरेच झाले आणि शिवसेनेचे दोन भाग करूनही मूळ शिवसेना जास्त वेगाने पुढे जात आहे, असे सांगत ठाकरे गटाने भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – INDIA Vs NDA : मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या, ठाकरे गटाचा निशाणा

- Advertisement -

काँग्रेसने शिवसेनेशी बेइमानी केली नाही, तर 25 वर्षे एकत्र असलेल्या भाजपाने शिवसेनेबरोबर बेइमानी केली. त्यामुळे भाजपाच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी उगाच गोटेमारी करू नये. मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, असे शिवसेनाप्रमुखांचे वक्तव्य होते आणि त्याची आठवण बावनकुळे करून देत आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील तेव्हाची बजबजपुरी शिवसेनेत येऊ देणार नाही हा शिवसेनाप्रमुखांच्या त्या म्हणण्याचा अर्थ होता, पण आज भाजपाने स्वतःची ‘काँग्रेस’ करून घेतली आहे, त्याचे काय? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.

‘कमळा’बाईने भ्रष्टाचाराची साथ स्वीकारली आणि शिवसेना त्या बजबजपुरीतून बाहेर पडली. आता ही बजबजपुरी लोकांना कायमची संपवायची आहे, असे सांगत ठाकरे गटाने म्हटले आहे की, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भीती भाजपाला वाटणे स्वाभाविक आहे. दोन्ही नेत्यांना उदंड जनसमर्थन मिळते आहे. त्यांना भाड्याने माणसे आणून गर्दी जमवावी लागत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray group : …तर भाजपाचे दुकान एका रात्रीत बंद पडेल, ठाकरे गटाचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंसाचारग्रस्त मणिपुरात गेले नाहीत, पण राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मणिपुरातून सुरू झाली ती मुंबईत पोहोचली. मुंबईने राहुल गांधी यांचे स्वागत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तेव्हा इंदिरा गांधी यांचे स्वागतच केले होते, पण तेव्हा भाजपा आणि बावनकुळे यांचा जन्म व्हायचा होता, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

राहुल गांधी यांनी देशातील वातावरण नक्कीच जिवंत केले आहे. मुंबईत त्यांनी बहार आणली. इंडिया आघाडीने मुंबईत युद्धाचा शंख फुंकला. भाजपाने काँग्रेसचाच लंगोट बांधला असल्याने शंख फुंकताच त्यांचा लंगोट सुटला. त्याचे आता काय करायचे? दिवा विझता विझता मोठा होतो तसे भाजपाचे झाले आहे. भाजपाने स्वतःच्या काँग्रेजी लंगोटाची काळजी घ्यावी. नसत्या उठाठेवी करू नयेत, असा सल्ला ठाकरे गटाने दिला आहे.

हेही वाचा – NCP-SP : डिजिटल इंडिया धोरण स्वत:साठी जोरात, एनसीपी-एसपीचे भाजपावर शरसंधान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -