घरदेश-विदेशVeg Thaliची किंमत 5 टक्क्यांनी वाढली; वाचा सविस्तर

Veg Thaliची किंमत 5 टक्क्यांनी वाढली; वाचा सविस्तर

Subscribe

व्हेज थाळी महागल्या असलतील. तरी नॉनव्हेज प्रेमींसाठी नोव्हेंबर महिना चांगला गेला आहे. कारण चिकनचे दर घसरल्याने नॉनव्हेबज थाळी स्वस्थ झाली आहे.

मुंबई : राज्यात अवकाळी पाऊसामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात घट झालेली आहे. यामुळे कांदा, टोमॅटो आणि डाळ्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात व्हेज थाळीच्या किंमतीत 5 टक्क्यांने वाढ झाली आहे, अशी माहिती रेटिंग एजन्सी क्रिसिलने यांनी जाहीर केले आहे. यात नोव्हेंबर महिन्यात सणासुदीच्या काळात व्हेज थाळीची वाढती मागणी वाढ झाल्याचे म्हटले जाते.

नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यात कांद्यात 50 टक्के आणि टोमॅटोच्या दरात 35 टक्के वाढ झाली होती. जेवण्याची चव वाढवणाऱ्या दोन्ही पदार्थांच्या किंमती वाढ झाल्यामुळे व्हेज थालीच्या किंमतीत वाढ झाली आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये 2023 मध्ये व्हेज थाळीच्या किंमतीत 24 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती मिळाली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Winter Session : सत्ताधाऱ्यांचे मुंबईबाबतच्या चर्चेचे ठाकरे गटाने स्वीकारले आव्हान; ऐन थंडीत कोणाला फुटणार घाम?

यंदा व्हेज थाळी 9 टक्क्यांनी महागली

यापूर्वी देशभरात जून 2023 पासून टॉमेटोच्या किमती मोठी वाढ झाली होती. त्यावेळी टोमॅटो किरकोळ बाजारात 300 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते. यानंतर सप्टेंबर महिन्यात टोमॅटोचे दर घसरले आमि ऑक्टोबरपासून पुन्हा कांद्याचे भाव वाढले. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात शाकाहीर जेवणाच्या थाळीची किंमत वाढली. यापूर्वी नोव्हेंबर 2022च्या तुलनेत 9 टक्क्यांनी महाग झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर महिन्यात कांद्याच्या दरात 93 टक्के आणि टोमॅटोच्या दरात 15 टक्के वाढ झाली आहे. पण यंदा डाळ्यांचे भाव 21 टक्क्यांनी कडाल्यामुळे व्हेज थाळी महागली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – High Court: ‘कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही’; आगीच्या घटनांवरून हायकोर्टाने शिंदे सरकारला फटकारले

नॉनव्हेज प्रेमींना दिलासा

व्हेज थाळी महागल्या असलतील. तरी नॉनव्हेज प्रेमींसाठी नोव्हेंबर महिना चांगला गेला आहे. कारण चिकनचे दर घसरल्याने नॉनव्हेबज थाळी स्वस्थ झाली आहे. यामुळे मांसाहारी थाळीमध्ये 50 टक्के चिकनचाही समावेश होता.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -