घरदेश-विदेशSavings in India: बचत कमी अन् कर्ज वाढलं; 'या' कारणांसाठी लोक घेतायत...

Savings in India: बचत कमी अन् कर्ज वाढलं; ‘या’ कारणांसाठी लोक घेतायत कर्ज

Subscribe

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत भारतीय कुटुंबांच्या बचतीचा आकडा सुमारे 4 टक्क्यांनी घसरला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात तो GDP च्या 5.1 टक्के राहिला आहे.

मुंबई: Family Savings Decline: भारत पारंपरिकरीत्या बचत करणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. आलेल्या पैशातून चार पैसे गाठीला बांधणे आणि अंथरूण पाहून पाय पसरवणे हा भारतीयांचा स्वभाव. भारतीयांच्या बचत करण्याच्या या सवयीमुळे भारताला 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीसारख्या मोठ्या समस्यांना सहज सामोरे जाता आले. मात्र आता आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भारतीय कुटुंबांची बचत सातत्याने कमी होत आहे. पण, त्यांच्या मालकीची घरे आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तथापि, अर्थतज्ज्ञांच्या मते, भारतीय कुटुंबांची कर्ज परतफेड करण्याची क्षमता अजूनही जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त आहे. (Savings in India Savings down and debt up People take loans for Car and home)

भारतीय कुटुंबांच्या बचतीचा आकडा 4 टक्क्यांनी घटला

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत भारतीय कुटुंबांच्या बचतीचा आकडा सुमारे 4 टक्क्यांनी घसरला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात तो GDP च्या 5.1 टक्के राहिला आहे. तर 2020-21 मध्ये हाच आकडा 11.5 टक्के होता. सध्या 7 ते 7.5 टक्क्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा खूपच खाली गेला आहे. भारतातील लोक आता रिअल इस्टेट आणि वाहने खरेदीवर जास्त पैसे खर्च करत आहेत. त्यामुळे त्यांचे कर्ज वाढले आहे. तरीही भारतीयांची कर्ज फेडण्याची क्षमता जगातील विकसीत देशांच्या तुलनेत आजही जास्त आहे.

- Advertisement -

भारतीयांनी जी बचत केली आहे ती ते मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्यासाठी वापरत आहेत. बचतीतील कपातीमुळे भारतीय कुटुंबे कठीण काळात अडचणीत येऊ शकतात. रिझव्‍‌र्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या विश्‍लेषणानुसार बचतीतील घसरणीचा आकडा सध्या स्थिर आहे. याबद्दल काळजी करण्याची गरज नाही कारण भारतीय कुटुंबे मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्यासाठी त्यांच्या बचतीचा वापर करत आहेत.

अहवालानुसार, मार्च 2023 मध्ये भारताचे कर्ज सेवा प्रमाण 6.7 टक्के होते. हाच आकडा अमेरिकेत 7.8 टक्के, जपानमध्ये 7.5 टक्के, ब्रिटनमध्ये 8.5 टक्के, कॅनडामध्ये 14.3 टक्के आणि कोरियामध्ये 14.1 टक्के होता. या बाबतीत भारताची स्थिती जगातील इतर देशांपेक्षा चांगली आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: BJP : मोदी सरकारचे मौन रामराज्याच्या कुठल्या संकल्पनेत बसते? ठाकरे गटाचा थेट प्रश्न)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -