मॅगी हा झटपट बनवला जाणारा अगदी सोपा पदार्थ आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना मॅगी ही आवडते. मॅगी खूप पद्धतीने बनवली जाते. तसेच मॅगीचा मसाला हा घरी देखील आपण बनवू शकतो. चटपटीत मॅगी मसाला बनविण्यासाठी जाणून घ्या साहित्य आणि कृती…
- Advertisement -
साहित्य-
- 2 टीस्पून धने पावडर
- 1 टीस्पून जिरे पावडर
- 1 टीस्पून गरम मसाला
- 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर
- 1/4 टीस्पून मेथी पावडर
- 1/2 टीस्पून हळद
- 1/4 टीस्पून दालचिनी पावडर
- 1/2 टीस्पून लाल तिखट
- 1/2 टीस्पून मीठ
- 4 टीस्पून साखर

कृती-
- होममेड मॅगी मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम वरती दिल्याप्रमाणे सगळे मसाले एकत्र करू घ्या.
- यानंतर हे सर्व मसाले मिक्सरच्या जार मध्ये बारीक करून घ्या.
- तुम्ही यात बाजारात रेडी मिळणारे मसाले वापरू शकता किंवा घरी देखील तयार करू शकता.
- हा तयार झालेला मॅगी मसाला एयर टाईट कंटेनर मध्ये भरून ठेवा. खराब होणार नाही.
- तसेच बरणी काचेची असेल तर उत्तमच. खराब होणार नाही.
- झटपट 2 मिनीटात तयार होणारा हा मसाला तुम्ही सुखी भाजी, ग्रेव्हीवाली भाजी या पदार्थांसोबत खाऊ शकता.
- Advertisement -
हेही वाचा :