घरमहाराष्ट्रRahul Gandhi : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; भारत जोडो न्याय यात्रा...

Rahul Gandhi : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमांतून लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पुढील आठवड्यात धडकणार असून यावेळी सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. (Rahul Gandhis meeting at Chief Ministers Fort Add India to Nyaya Yatra Thane)

हेही वाचा – Jarange VS Fadnavis : फडणवीसांनी मला आत टाकून दाखवावेच; जरांगेंचे पुन्हा आव्हान

- Advertisement -

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही येत्या 12 मार्चला गुजरातमधून नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव आणि नाशिकमार्गे ही यात्रा 15 मार्चला वाडा आणि भिवंडी याठिकाणी येईल. त्यानंतर 15 तारखेला भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात धडकले. 15 तारखेला ठाण्यात सभेचं आयोजन करण्यात आलं असून त्यानंतर 16 तारखेला भारत जोडो न्याय यात्रा मुलूंड आणि त्यानंतर 17 मार्चला दादर येथील चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे.

भारत जोडो न्याय यात्रेला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी या यात्रेचे नियोजन आणि कार्यक्रमांची आखणी करण्यासंदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी ठाणे काँग्रेस मुख्यालयात बैठक घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. याशिवाय मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीलाही राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Kapil Patil : कपिल पाटलांची वेगळी चूल, जेडीयूची साथ सोडली; नितीश कुमारांना धक्का

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राहुल गांधीही नाशिकच्या प्राचीन काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला नाशिक शहरात येणार आहे. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता राहुल गांधी भव्य रोड शो करणार असून त्यानंतर ते काळारामांच्या दर्शनाला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाशिकच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या स्वागताची जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिराचे महत्त्व वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -