घरदेश-विदेशSanjay Raut : अरविंद केजरीवाल आता मोदींसाठी अधिक धोकादायक बनलेत, संजय राऊतांचा...

Sanjay Raut : अरविंद केजरीवाल आता मोदींसाठी अधिक धोकादायक बनलेत, संजय राऊतांचा दावा

Subscribe

मुंबई : कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. पण अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरतात. आता तुरुंगातूनच कामकाज चालवत असल्याने ते आणखी धोकादायक बनले आहेत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जातीपातीत फूट पाडून कोणी राजकारण केले…, सातपुतेंचे प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर

- Advertisement -

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे 28 मार्चपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. कोर्टात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले होते की, ‘मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नाही. सरकार चालवायचं झाले तर ते मी तुरुंगातून चालवेन.’ त्यानुसार ते आता तुरुंगातून सरकार चालवत आहेत.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांनी ईडीच्या ताब्यात असताना जल मंत्रालयाशी संबंधित पहिला आदेश जारी केला. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत म्हणाले की, ते तुरुंगातून काम करत असल्याने लोक त्यांचे म्हणणे ऐकतील आणि त्यांच्या समर्थनार्थ पुढे येतील. एवढे काय, स्वातंत्र्यलढ्यात जे नेते तुरुंगात गेले ते आणखी कणखर बनून समोर आले.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ मेगा रॅली काढण्याचा निर्णय विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाने घेतला आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. 31 मार्च रोजी राजधानीतील रामलीला मैदानावर ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये आमचा पक्षही सहभागी होणार आहे. त्यासाठी दिल्लीला जाण्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील गांभीर्याने विचार करीत आहेत, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : भाजपाची घोडदौड महाराष्ट्रच रोखेल, विजय वडेट्टीवारांना विश्वास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -