घरदेश-विदेशPashupati Paras Resign : माझ्यावर अन्याय झाला..., केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा...

Pashupati Paras Resign : माझ्यावर अन्याय झाला…, केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

Subscribe

भाजपाने केलेल्या जागा वाटपावर नाराजी व्यक्त करत लोक जनशक्ती पार्टीचे (एलजेपी) अध्यक्ष पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

नवी दिल्ली : भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. परंतु, यामध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांची आणि मंत्र्यांची नाव नसल्याने त्यांच्याकडून उघडपणे याबाबातची नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजपाने केलेल्या जागा वाटपावर नाराजी व्यक्त करत लोक जनशक्ती पार्टीचे (एलजेपी) अध्यक्ष पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज (ता. 19 मार्च) मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी राजीनामा दिल्याचे घोषित केले. तसेच, वैयक्तिकरित्या आपल्यावर अन्याय झाल्याचे पशुपती पारस यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Union Minister Pashupati Paras resigns after not getting Lok Sabha Elections nomination)

हेही वाचा… Raj Thackeray : क्षणिक सत्तेची लाचारी म्हणावी की…, एनसीपी-एसपीचे राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

- Advertisement -

राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) जागावाटपामुळे नाराज झालेल्या लोक जनशक्ती पार्टीचे (एलजेपी) अध्यक्ष पशुपती पारस हे नाराज झाले आहेत. त्यांनी त्यांची ही नाराजी प्रसार माध्यमांसमोर उघडपणे व्यक्त केली आहे. राजीनामा दिल्यानंतर पशुपती पारस म्हणाले की, “मी समर्पक भावनेने आणि निष्ठेने एनडीएची सेवा केली, परंतु वैयक्तिकरित्या माझ्यासोबत अन्याय झाला. आजही मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आभारी आहे. मला जेवढे बोलायचे होते, तेवढे बोललो आहे. आमच्या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसोबत बसून आम्ही भविष्यातील राजनीती ठरवू.” असे पशुपती कुमार पारस यांच्याकडून सांगण्यात आले.

तर, पशुपती पारस यांनी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा सोपविला आहे. पशुपती पारस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “महोदय, मी तुम्हाला कळवू इच्छितो की काही अपरिहार्य कारणांमुळे मी मंत्रिपरिषदेचा तत्काळ प्रभावाने राजीनामा देत आहे. दरम्यान, मंत्रिपरिषदेचा सदस्य म्हणून माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद”.

- Advertisement -

सोमवारी एनडीएने बिहारमधील लोकसभेच्या 40 जागांसाठी तिकीट वाटपाची घोषणा केली. या जागावाटपात भाजपा, जेडीयू, एलजेपी (रामविलास), राष्ट्रीय लोक मोर्चा आणि एचएएमचा समावेश आहे. मात्र, पशुपती कुमार पारस यांच्या एलजेपीला एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे एनडीएमध्ये सहभागी असेलला एलजेपी नाराज असल्याचे सांगण्यात येते. तर एनडीएमध्ये जागा न मिळाल्याने नाराज असलेले पशुपती पारस आरजेडीच्या संपर्कात आहेत. आज ना उद्या ते मोठी घोषणा करतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -