घरदेश-विदेशMenstrual Leave : मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी; या विद्यापीठाचा निर्णय

Menstrual Leave : मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार सुट्टी; या विद्यापीठाचा निर्णय

Subscribe

प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा भाग म्हणजे मासिक पाळी. ही एक शारिरीक प्रक्रिया आहे, जी दर महिन्याला महिलांना येते. दर महिन्याला ही मासिक पाळी आल्यानंतर, महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या काळात स्त्रियांना अनेक शारिरीक समस्यांचा सामना करावा लागतो. यातच आता नुकताच एका विद्यापीठाने मुलींसाठी अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाची जोरदार चर्चा रंगताना दिसतेय. विद्यार्थिनींच्या आरोग्याचा विचार करून मासिक पाळीत सुट्टी देण्याचा निर्णय या विद्यापीठाने घेतला आहे.

विद्यार्थीनींना पीरियड्सच्या काळात सुट्टी देण्याचा निर्णय चंडीगडच्या पंजाब यूनिवर्सिटीकडून घेण्यात आला आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच विद्यापीठाने मासिक पाळीच्या रजेचा पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले तरी विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत. पीरियड्सच्या काळात विद्यार्थीनींना एक दिवसाची सुट्टी मिळणार आहे. यासाठी विद्यार्थीनींना एक अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थीनींना एका महिन्यात एक सुट्टी ही पीरियड्सच्या दिवसात मिळणार आहे. मात्र, फक्त वर्ग सुरू असतानाच ही सुट्टी मिळेल.

- Advertisement -

मुलींना परीक्षेदरम्यान या रजेसाठी अर्ज करता येणार नाही. रजेची परवानगी अध्यक्ष/संचालकांकडून दिली जाईल. विद्यार्थ्याने स्व-प्रमाणपत्राच्या आधारे रजा दिली जाईल. यानंतर विद्यार्थ्यांची हजेरी आणि सुट्ट्या तपासल्या जातील. रजा कोणत्याही कारणास्तव वर्षाच्या कोणत्याही कालावधीसाठी वाढवता येणार नाही.

पंजाब यूनिवर्सिटीच्या आधी 2023 मध्ये केरळच्या कोचीन यूनिवर्सिटीने हा निर्णय घेतला. कोचीन यूनिवर्सिटीमध्ये विद्यार्थीनींना पीरियड्समध्ये सुट्टी मिळते. आता पंजाब यूनिवर्सिटीच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मात्र, ही सुट्टी प्रत्येक महिन्याला घेण्यासाठी विद्यार्थीनींना एक अर्ज करावा लागणार आहे.

- Advertisement -

कोचीन, पंजाब यूनिवर्सिटीसोबतच हैद्राबाद आणि अजून काही यूनिवर्सिटींनी अशाच प्रकारचा निर्णय हा घेतलाय. अजूनही काही यूनिवर्सिटींकडून अशाप्रकारचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेकदा मुलींना खूप त्रास होत असताना देखील पीरियड्सच्या काळात महाविद्यालयात जावे लागते, तेच टाळण्यासाठी हे निर्णय घेतले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -