Thursday, April 25, 2024
घरमानिनीHealthघाम येणे चांगले का वाईट? जाणून घ्या..

घाम येणे चांगले का वाईट? जाणून घ्या..

Subscribe

शरीराला घाम येणे ही सामान्य गोष्ट आहे. घाम येण्याची अनेक कारणे असली तरी वर्कआउटनंतर किंवा उन्हाळ्यात जो घाम येतो तो शरीरासाठी चांगला असतो. घाम येणे चांगले का वाईट हे समजण्याआधी शरीराला घाम येणे म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे. घाम म्हणजे शरीरातून बाहेर पडणारे पाण्याचे छोटे थेंब, ज्यात अमोनिया, युरिया, मीठ आणि साखर असतात.

आपल्या शरीराचे तापमान जेव्हा सामान्यपेक्षा जास्त असते तेव्हा घामाच्या ग्रंथी शरीराचे तापमान नियमित करण्यासाठी सक्रिय होतात आणि शरीरातील पाणी शोषून घेतात. पाणी शोषून घेतल्यानंतर त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावर पोहचतात. शरीरातुन बाहेर पडणारे हे पाणी उष्माघाताचा धोक्यापासूनही आपले रक्षण करते. या पाण्याला आपण सामान्य भाषेत घाम असे म्हटले जाते.

- Advertisement -

घाम येण्याचे फायदे –

- Advertisement -

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात – घाम आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकतो. अशाने घामामुळे शरीराची चांगली साफसफाई होते आणि सर्व अवयव उत्तमरीत्या कार्य करतात.

त्वचा सुधारते – आपण खूप बारकाईने पाहिल्यास घाम निघतो तेव्हा त्वचेवर एक वेगळीच चमक येते हे लक्षात येते. प्रत्यक्षात, घामामुळे त्वचेची छिद्र उघडतात. अशावेळी त्वचेवर जमा झालेले विषारी पदार्थ घामाच्या माध्यमातून बाहेर पडतात. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि सर्व समस्या दूर होतात.

रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते – दररोज वर्कआउट केल्याने घाम येत असल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. रोगप्रतिकारशक्ती मजबूत झाल्यास शरीरा सर्व आजारांशी लढू शकते. परिणामी, तुम्ही कमी आजारी पडता.

या गोष्टीशी महत्वाच्या –

  1. घामाचा वास येतो, असे काही जण म्हणतात, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. वास येतो ते त्या ठिकाणी असलेल्या बॅक्टरीयांचा.
  2. काहीही न करता तुम्हाला घाम येत असेल तर हार्ट अटॅकचे हे लक्षण असू शकते. अशावेळी कोणत्याच गोष्टींची वाट न पाहता तज्ञांचा सल्ला घ्या.
  3. थायरॉईड आणि मज्जासंस्थेच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तींना अधिक घाम येतो.
  4. कधीकधी जेवण करताना घाम येतो हे केवळ जास्त मसालेदार पदार्थ खाल्याने होऊ शकते.

घाम न येणे शरीरासाठी हानिकारक –

काही जणांना तुम्ही पहिले असेल की ज्यांना घाम येत नाही. असे घाम न येणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, घाम न येणे त्वचारोगाशी संबंधित समस्या असू शकते. शरीराला घाम न आल्यास शरीरातून घाण बाहेर टाकली जात नाही. त्यामुळे तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम दिसून येतो.

 

 

 


हेही वाचा : jumping jacks benefits : जंपिंग जॅकचे हे आहेत फायदे

 

- Advertisment -

Manini