तमिळ सुपरस्टार थलपती विजय हा अभिनय आणि त्याच्या दमदार अॅक्शनमुळे ओळखला जातो. थेरी, मास्टर , बीस्ट, वरिसू, खुशी, लिओ अशा सुपरहिट चित्रपटात काम करुन त्याने सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर सुपरस्टार थलपती विजयने आता राजकारणात प्रवेश केला आहे.
थलपती विजयने आपल्या पक्षाची स्थापना केली आहे. ‘तमिलागा वेत्री कळघम’ असे त्याच्या राजकीय पक्षाचं नाव ठेवले आहे. पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यात आली आहे. हा पक्ष २०२६ ची विधानसभा निवडणूक लढवणार. एक्स पोस्ट करत थलपतीने याची माहिती दिली आहे.
सुपरस्टार थलपती विजय म्हणाला, “आमच्या पक्षाला निवडणूक आयोगाने नोंदणीकृत केले आहे. “मी नम्रपणे सांगू इच्छितो की, पक्षाच्या महापरिषद आणि कार्यकारी समितीने 2024 ची लोकसभा निवडणूक न लढण्याचा शिवाय, पक्षाकडून इतर कोणालाही पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे.
#தமிழகவெற்றிகழகம் #TVKVijay https://t.co/Szf7Kdnyvr
— Vijay (@actorvijay) February 2, 2024
राजकारणात पूर्णपणे वेळ देणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन थलापती विजयने हा निर्णय घेतला आहे. थलपती लवकरच त्याच्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करुन चित्रपटविश्वातून ब्रेक घेणार आहे. सध्या थलपती हा वेंकट प्रभू यांच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट असेल असंही त्याच्या निवेदनातून समोर आले आहे.