घरमहाराष्ट्रManoj Jarange Patil : मनोज जरांगेंना सरकारी सुरक्षा; सशस्त्र पोलीस 24 तास...

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंना सरकारी सुरक्षा; सशस्त्र पोलीस 24 तास तैनात

Subscribe

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत. त्यांचा हा लढा अद्यापही सुरू असला तरी 26 जानेवारीला त्यांच्या या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मसुदा जरांगेंना दिल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले. या यशस्वी लढ्यानंतर मनोज जरांगे पाटीले हे तब्बल पाच महिन्यानंतर गुरुवारी (1 फेब्रुवारीला) त्यांच्या घरी परतले आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सशस्त्र पोलीस तैनात केले आहेत. (Manoj Jarange Patil Government security for Manoj Jarange Armed police deployed 24 hours a day)

हेही वाचा – Uddhav Thackeray : भाजपा ‘चारसौ पार’ कशी जाते, तेच बघतो; ठाकरेंचं खुलं आव्हान

- Advertisement -

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण केले होते. मात्र या उपोषणस्थळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा करत मराठा आंदोलन राज्यभर पोहचवले. आमरण उपोषण, आंदोलन अशा अनेक कठीण पायऱ्या पार करत, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्याची शपथ जरांगे यांनी घेतली होती. याशिवाय त्यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी मुंबईवर मोर्चा काढला. मात्र राज्य सरकारने मराठा मोर्चा वाशी याठिकाणी थांबवत मराठा आरक्षणाचा मसुदा मनोज जरांगे यांना दिला. यामुळे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळाले.

हेही वाचा – Sanjay Raut : अखेर प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला हजर; राऊत म्हणतात, भाजपाला मदत होईल…

- Advertisement -

मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्यानंतर जरांगे घरी परतले, त्यावेळी परिसरात नागरिकांकडून जल्लोष करण्यात आला. दरम्यान, सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे पाटील यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. अशातच आता राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. आजपासूनच दोन कॉन्स्टेबल मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -