घर मनोरंजन ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुन दिसले एकत्र

ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान मलायका-अर्जुन दिसले एकत्र

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा त्यांच्या नात्यामुळे सतत चर्चेत असतात. हे दोघेही मागील 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघंही एकमेकांवरील प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसतात. नुकत्याच काही दिवसांपासून या दोघांचा ब्रेकअप झाल्याची बातमी समोर येत होती. या दोघांमध्ये काहीही ठीक सुरु नसल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान, नुकताच एक नवा फोटो समोर आला आहे ज्यामध्ये हे दोघंही एकत्र डीनर डेटवर गेलेले दिसत आहेत.

मलायका-अर्जुन पुन्हा एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मागील काही दिवसांपासून मलायका-अर्जुनचा ब्रेकअप झाला असं म्हटलं जात होतं. मात्र, रविवारी रात्री मुंबईच्या एका हॉटेलमध्ये हे दोघेही डिनर डेटसाठी गेले होते. यावेळी अर्जुन कपूर ग्रीन हुडी घातली होती. तर मलायकाने ब्लेझरसह पांढरा ब्रॅलेट टॉप घातला होता. यावेळी दोघेही नेहमीप्रमाणे आनंदात दिसले. यावरुनच मलायका-अर्जुनच्या ब्रेकअपची बातमी खोटी ठरली आहे.

5 वर्षांपासून करतायत एकमेकांना डेट

- Advertisement -

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या 5 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांनी मलायकाने अर्जुनसोबतचे नाते अधिकृत केले. अर्जुन आणि मलायकाच्या वयात 13 वर्षांचे अंतर असूनही त्यांची केमिस्ट्री खूप छान आहे. दरम्यान, अर्जुन कपूर लवकरच ‘मेरी पटनी का रिमेक’मध्ये दिसणार आहे.


हेही वाचा :

सुष्मिता सेनने ‘या’ कारणास्तव अक्षय कुमारचा सिनेमा सोडला होता

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -