केसर फिरनीची चव खूप छान लागते. काही गोड बनवण्या व्यतिरिक्त तुम्ही रक्षाबंधनाच्या निमित्ताने फिरणी देखील बनवू शकता. आता आपण केसर फिरनी कशी बनवायची हे पाहणार आहोत जाणून घेऊया याला लागणारे साहित्य आणि कृती…
साहित्य
- तांदूळ – 100 ग्रॅम (1/2 कप)
- दूध – 1 लिटर फुल क्रीम
- केशर – 20-25 तुकडे
- पिस्ता – 10-12 (बारीक चिरून)
- काजू – 10 – 12 (लहान तुकडे)
- साखर – 75 ग्रॅम (1/2 कप)
कृती
- सर्वप्रथम फिरणी बनवण्यासाठी लहान तांदूळ वापरा.
- हे तांदूळ चांगले धुवा आणि 1 तास पाण्यात भिजवा. यांनतर तांदूळ फुगल्यावर हाताने याला हलके मॅश करा.
- हे झाल्यावर गॅसवर एक पॅन ठेवा आणि त्यात दूध घाला. तसेच हे दूध मंद आचेवर शिजवा.
- एक उकळी आली की तयार भात त्यात घाला. आता चमच्याने या मिश्रणाला चांगले ढवळत राहा.
- तसेच तांदूळ शिजेपर्यंत आणि फिरनी घट्ट होईपर्यंत मंद आचेवर हे शिजवून घ्या.
- फिरनी शिजल्यावर त्यात साखर, केशर, पिस्ता आणि काजूचे तुकडे घालून मिक्स करा.
- साखर विरघळेपर्यंत फिरनी शिजवा. फिरनीमध्ये वेलची पूड तुम्ही चवीसाठी टाकू शकता.
- आता तुमची फिरनी तयार आहे. फिरनी सर्व्ह करताना त्यावर बदामाचे तुकडे टाकू शकता.
हेही वाचा : Recipe: रक्षाबंधनासाठी खास घरच्या घरी अशी बनवा काजू कतली
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -