Tuesday, April 30, 2024
घरमानिनीKitchenRecipe : गरमागरम गाजर हलवा

Recipe : गरमागरम गाजर हलवा

Subscribe

नुकताच आता थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. या हंगामात मिठाईच्या दुकानांमध्ये गाजराचा हलवा मोठ्या प्रमाणात खरेदी करताना पाहायला मिळतो. तसेच तुम्ही घराच्या घरी स्वादिष्ट हलवा अगदी सहज बनवू शकता. यासोबतच सुक्या मेव्यापासून बनवलेला गाजर हलवा हलवा घरातील सर्वांनाच आवडतो. चला तर मग पाहुयात कमीत कमी वेळात गाजर हलवा कसा बनवायचा…

Gajar Ka Halwa - CookForIndia.com

- Advertisement -

साहित्य

  • 8 ते 9 गाजर
  • 4 कप फुल क्रीम दूध
  • 4 चमचे तूप10 ते 12 चमचे साखर
  • 5 ते 6 हिरव्या वेलची
  • 10 ते 12 अख्खे काजू (काप करून घ्या )
  • 10 ते 12 बदाम – (काप करून घ्या )
  • 2 चमचे मनुका
  • 1 चिमूटभर केशर

कृती

  • सर्वप्रथम, गाजर स्वच्छ धुवून ते सोलून चांगले किसून घ्या.
  • यानंतर कढईत किंवा खोलगट भांड्यात पॅनमध्ये दूध आणि किसलेले गाजर मिसळा.
  • हे संपूर्ण मिश्रण मध्यम आचेवर उकळून घ्या.
  • तसेच यानंतर गाजर मऊ होईपर्यंत शिजू द्या.
  • हे झाल्यावर दूध आटल्यावर त्यात तूप, साखर आणि वेलची पावडर मिसळा.
  • आता गाजरात साखर घाला, आणि ठराविक अंतराने ढवळत राहा.
  • गाजराच्या हलव्याचे बाष्पीभवन होईपर्यंत गाजर चांगले शिजवा.
  • शेवटी काजू, बदाम, केशर आणि मनुका घाला.
  • नंतर त्यात वेलची घाला. तुमचा गाजराचा हलवा आता तयार आहे.

हेही वाचा : Beet Halwa : बीटापासून बनवा हेल्दी हलवा

- Advertisment -

Manini