घरमहाराष्ट्रनागपूरPraful Patel यांना वाचवण्यासाठी सारवासारव सुरू - संजय राऊत

Praful Patel यांना वाचवण्यासाठी सारवासारव सुरू – संजय राऊत

Subscribe

दीपक केसरकरांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी. केसरकरांचे डिपॉजिट नाही गेले तर बघा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश नागपूरमध्ये सुरू आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती. यावेळी विधानसभेत नवाब मलिक यांनी अजित पवार गटाच्या बागावर जाऊन बसल्यामुळे ते त्यांच्यात जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले होते. देवेंद्र फडणवीसांनी लिहलेले पत्र हे गैरसमजूतीतून लिहले होते, असे अजित पवार यांनी म्हटले. हे सर्व प्रफुल्ल पटेलांना वाचवण्यासाठी सारावासारव आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यासाठी जे पत्र लिहले होते. ते गैरसमजूतीने लिहले असे म्हणत अजित पवारांनी सारवासारव केली आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “प्रफुल्ल पटेलांना वाचवण्यासाठी ही सर्व सारावासारव सुरू आहे. प्रफुल्ल पटेलांचा मिर्चींचा ठेचा बाहेर आला. त्यानंतर आमच्याकडून जो झटका लागला. आमचे मत आहे की, मलिकांना एक न्याय आणि पटेलांना दुसरा न्याय याला ढोंग म्हणतात आणि या दोघांवर दाऊससंदर्भातील आरोप आहेत. मग तुम्ही मलिकांना अस्पृश्य करता आणि पटेलांची पंतप्रधान आणि गृहमंत्री गळाभेटी घेतात.”

- Advertisement -

हेही वाचा – Ravindra Berde : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

धनुष्याबण आमचा म्हणणारे कमळाबाईचे गुलाम 

कमळ हे धनुष्यबाणापेक्षा जास्त प्रभावी आहे, असे शिंदे गटाच्या काही खासदारांना वाटत आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “ही जी शिवसेना आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणापेक्षा कमळ अधिक प्रवभावी वाटते. यात शिंदे गटाचे ढोंग उघडे पडले ना. पण शिवसेनेकडून धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव काढून घेण्यासाठी भाजपाने जे कारस्थान केले. ते यातून उघड झाले, हे सर्व जण कमळाबाईचे गुलाम आहेत. ते कमळाबाईच्या चिन्हावर निवडणुका लढवणार हे नक्की आहे. कारण जरी त्यांना (शिंदे गट) धनुष्यबाण आणि चिन्ह दिले असेल, तरी यापैकी कोणत्याही उमेदवाराला आपले डिपोजित वाचवता येणार नाही. याची खात्री पटल्यामुळे त्यांना भीती वाटू लागली असून त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढवायची आहे. यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार जे म्हणत होते धनुष्यबाण आणि शिवसेना आमची ते तर कमळाबाईचे गुलाम होत आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – Onion Export Ban : सर्वसामावेशक कांदा धोरण मोदी सरकारने का राबवू नये? ठाकरे गटाचा सवाल

केसरकरांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवावी

बंडानंतर दोन गाड्या माझा पाटला करत होते, असे दीपक केसरकरांनी आमदार अपात्रतेच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे, यावर संजय राऊत म्हणाले, “असा उंदीरांचा कोणी पाठला करते का? उंदराच्या मागे मांजर लागली की, तिने त्यांना कधीच उंदीराला खाऊन टाकते. हे सर्व जण आमच्याकडे आलेले पळपुटे उंदीर होते. ते कधी बिळात आणि कोपऱ्यात लपले. यांना कोण विचारते आणि यांचा कोण पाठलाग करणार आहे. हे कोण आहेत, कधी या बिळात, त्या बिळात. दीपक केसरकरांनी सावंतवाडीतून निवडणूक लढवून दाखवावी. केसरकरांचे डिपॉजिट नाही गेले तर बघा, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -