घरमहाराष्ट्रपुणेWinter Session : इंद्रायणी नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार, मंत्री उदय सामंतांची माहिती

Winter Session : इंद्रायणी नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार, मंत्री उदय सामंतांची माहिती

Subscribe

नागपूर : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हा प्रश्न आज (ता. 13 डिसेंबर) विधानसभेत लक्षवेधी सूचनांच्या दरम्यान उपस्थित करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेच्या कामकाजात हा प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले. तर इंद्रायणी नदीत कत्तलखान्याची घाण सोडली जात असल्याचा आरोप दिलीप मोहिते-पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या प्रश्नांना उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून सकारात्मक उत्तर देण्यात आले. इंद्रायणी नदी लवकरच प्रदूषणमुक्त करण्यात येणार, अशी महत्त्वपूर्ण माहिती देखील यावेळी मंत्री उदय सामंत यांच्याकडून देण्यात आली आहे. (Winter Session: Indrayani River will soon be free from pollution, Minister Uday Samant)

हेही वाचा – Winter Session : अधिवेशनातील दोन दिवसांच्या चर्चेनंतर 55 हजार 520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर

- Advertisement -

लक्षवेधीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित करत म्हटले की, पिंपरी चिंचवडमधील काही नाल्यातील पाणी थेट इंद्रायणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढत आहे. नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक व्यवसाय आणि उद्योगधंदे असे आहेत, ज्याचे सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. ज्याचा मोठा परिणाम नदीच्या पाण्यावर होतो. त्यामुळे अशा उद्योगांवर कारवाई करण्यात येणार का? असा प्रश्न लांडगे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. तर याच प्रश्नाशी आधारित उपप्रश्न हा दिलीप मोहिते पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, आळंदीमध्ये इंद्रायणी नदीच्या प्रदूषणामुळे त्या नदीतील पाणी पिल्याने तिथल्या नागरिकांना काविळीसारखे व अन्य साथीचे आजार होत आहेत. तर बेकायदेशीर कत्तलखाने या परिसरात रात्रीच्या वेळी सूरू असतात. इंद्रायणी परिसरात रात्रीच्या वेळी जनावरांची कत्तल केली जाते. एक प्रकारचा स्मगलिंगचा व्यवसाय इथे केला जात आहे. परंतु, त्यानंतर सकाळी स्वच्छ पाण्याने हा परिसर साफ केला जातो. जे पाणी इंद्रायणी नदीत सोडले जाते. पण तिथे येणारे लोक हे त्या पाण्याचा वापर तिर्थ म्हणून करतात. त्यामुळे सरकारचा सीएसआर फंड हा नको त्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे सीएसआर फंडचा योग्य वापर करून या नदीत जाणारे अशुद्ध आणि अस्वच्छ पाणी नदीत जाणार नाही, याची काळजी सरकारकडू घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या दोन्ही प्रश्नाला उत्तर देताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, लवकरात लवकर इंद्रायणी नदी संदर्भातील 995 कोटींच्या आराखड्याचा केंद्राकडे असलेल्या पाठपुरावा केला जाईल. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्या प्रमाणे या विषयाशी निगडीत बैठक घेतली आहे. त्यामुळे इंद्रायणी नदी आणि त्यासोबतच पावना नदी यांमधील प्रदूषण कसे कमी करता येईल, याबाबतची शासनाकडून सकारात्मक पाऊले उचलण्यात येणार आहे, त्यामुळे आता लवकरच इंद्रायणी नदी ही प्रदूषणमुक्त करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -