घरमहाराष्ट्रठाकरे गटाला पुन्हा एकदा दे धक्का; राजेश सोनवळे शिंदे गटात

ठाकरे गटाला पुन्हा एकदा दे धक्का; राजेश सोनवळे शिंदे गटात

Subscribe

शिवसेना ठाकरे गटाचे विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत यांच्या विभागातील टागोर नगरमधील शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांच्यासोबत मोठ्या संख्येने गटप्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते काल, (सोमवार)  रात्री 9 वाजता 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे विक्रोळी विधानसभा आमदार सुनील राऊत यांच्या विभागातील टागोर नगरमधील शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांच्यासोबत मोठ्या संख्येने गटप्रमुख, पदाधिकारी कार्यकर्ते काल, (सोमवार)  रात्री 9 वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे. ( Shiv Sena Thackeray group’s Vikhroli Assembly Tagore Nagar branch chief Rajesh Sonawale entered in Shinde Group )

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विक्रोळी टागोर नगर विभागाचे शाखाप्रमुख राजेश सोनवळे यांनी सोमवारी रात्री ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या धारावी येथील माजी नगरसेविका रेश्मा बानो वकील शेख आणि जोगेश्वरी येथील माजी नगरसेविका नाजिया सोफिया यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामाजिक तसेच राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राज्य शासनाच्यावतीने आपल्या प्रभागातील सर्व प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी लावण्यात येतील, असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी आमदार मनीषा कायंदे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, शिवसेना उपनेत्या कला शिंदे हेदेखील उपस्थित होते.

( हेही वाचा: दिल्ली लोकसेवा विधेयक: भाजपनं मतदानासाठी माणसं विकत घेतली; राऊतांचा आरोप )

- Advertisement -

शिंदे गटात मूळ शिवसेना पक्षातून 40 आमदार, खासदार गजानन कीर्तिकर, खा. राहुल शेवाळे आदी खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. अद्यापही ठाकरे गटातील काही आमदार, माजी नगरसेवक, नेते, पदाधिकारी, शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आदी मंडळी यांचे इनकमिंग शिंदे गटात जोरात सुरू आहे.

याआधीही विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्याआधी, विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे, राहुल कनाल यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -