उन्हाळयात आंबे आणि कैरी यापासून अनेक पदार्थ बनवतात. तसेच आंबा आणि कैरी हे फळ आरोग्याला हितकारक असून याचे अनेक फायदे आहेत. विशेष करून कैरी खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. यासोबत शरीराची पचन क्रिया देखील सुधारते. कैरीची कढी उन्हाळ्यात खासकरून सेवन करावी. जाणून घेऊया कैरीची कढी कशी बनवतात ते पाहूया-
- Advertisement -
साहित्य-
- 1 मोठी कडक कैरी
- 2 लवंग
- पाव इंच दालचिनीचा तुकडा
- 1 चमचा बेसन पीठ
- 1 चमचा लाल तिखट
- मीठ,तेल,हळद (प्रमाणानुसार)
- फोडणीचे साहित्य- मोहरी,जिरं,कडीपत्ता,मिरची
- 2 टेबल स्पून गूळ
- Advertisement -
कृती-
- सर्वप्रथम कैरी उकडून घ्यावी.
- कैरीचा गर मिक्सरमधून फिरवून घ्या.
- यानंतर १ चमचा लाल तिखट,मीठ,पाणी
- यामध्ये १ चमचा बेसन पीठ चांगलं मिसळून घ्या.
- हे झाल्यावर कढईत तेल घालून ते तापलं कि त्यात लवंग घाला.
- यासोबतच दालचिनीची पावडर करून घालावी. तसेच हळद घालावी.
- आता यामध्ये कैरीगराच तयार मिश्रण ओतावं.
- चवीनुसार मीठ घालावं. गुल घालावा.
- हे मिश्रण चांगलं उकळावं.
- यानंतर तयार कैरीच्या कढीवर छानपैकी बारीक कोथींबीर सर्व्ह करावी.
हेही वाचा : Mango Raita : उन्हाळयात घरी करा आंब्याचे रायते