Tuesday, May 30, 2023
घर मानिनी सुखी आणि आनंदी रहायचंय? मग सोडा 'या' गोष्टी

सुखी आणि आनंदी रहायचंय? मग सोडा ‘या’ गोष्टी

Subscribe

आपला हा आनंद आपल्यातच लपलेला असतो. मात्र काही चुकीच्या सवयींमुळे आपणच त्रासाला आमंत्रण देतो.

आपल्यापैकी प्रत्येकाला सुखी आणि आनंदी आयुष्य जगायचं असतं. स्ट्रेस, कटकटी कोणालाच नको असतात. पण खऱं तर आपला हा आनंद आपल्यातच लपलेला असतो. मात्र काही चुकीच्या सवयींमुळे आपणच त्रासाला आमंत्रण देतो. विशेष म्हणजे या वाईट सवयींबदद्ल आपल्याला ठाऊकच नसतं.

- Advertisement -

अपूर्ण झोप
जर आनंदी आणि सुखी जगायचं असेल तर त्यासाठी शरीराची आणि मनाची काळजी घेणं गरजेचे आहे. त्यासाठी ७ ते ८ तासाची झोप आवश्यक आहे. पण रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ६ तासाहूनही कमी झोप काहींना मिळते. त्यामुळे मेंदूला आवश्यक तेव्हढी विश्रांती मिळत नाही. साहजिकच त्याचा परिणाम शरीरावर होतो. रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होते. त्याचा परिणाम कामावर होतो.

- Advertisement -

नकारात्मक विचार

तब्येत चांगली ठणठणीत ठेवायची असेल तर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात. त्यांचा विचार करत राहील्याने स्ट्रेस वाढतो. यामुळे व्यक्ती निराश होते आणि नकारात्मक विचार करू लागते. याचा परिणाम रोगप्रतिकारशक्तीवर होतो. त्यामुळे विचारात जास्त न गुरफटता अडचणीतून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करावा. पॉझिटीव्ह व्यक्तींबरोबर राहावे.

सुपर पॉवर समजणे
जर तुम्ही घऱी आणि ऑफिसमध्ये एकाचवेळी अनेक काम करत असाल आणि आपणं मल्टीटास्कर आहोत असे तुम्हांला वाटतं असेल तर आधी थांबा. कारण ही सगळी कामं करून तुम्ही समोरच्याला तुम्हाला गुलाम बनवण्याची संधी देत आहात. कारण अशा हरकाम्यांचा समाजात वापर केला जातो. जिथे कमी तिथे आम्ही हे वाचायला किंवा ऐकायला जरी बरी वाटंत असेल तर ते चुकीचे आहे. कारण समोरचा आपल्याला काहीच येत नाही असे दाखवून तुमच्याकडूनच सगळे काम करून घेतो. आणि वरतून तुम्हाला मूर्ख बनवतो. त्यापेक्षा काम वाटून द्यावीत.

व्यसन

दारू, सिगारेट पिणे हे वाईटच आहे. या वाईट सवयी लागल्या की होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागतं नाही. कारण जेव्हा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक होतो. तेव्हा त्याचे वाईट परिणाम हे होतातच. दारू, सिगारेटमुळे शरीराचे नुकसान तर होतेच. त्याशिवाय पैशांचा अपव्यव आणि व्याधीही जडतात.

खोट बोलून वेळ मारणे

काहीवेळा वेळ मारून नेण्यासाठी अनेकजण खोटं बोलतात. पण एकदा की ही सवय जडली तर त्याचे दिर्घ वाईट परिणाम होतात. कारण अशा व्यक्तीवर कोणीही सहसा विश्वास ठेवत नाही. त्यापेक्षा एकदाच रोखठोक बोलून विषय मार्गी लावावा.

तणावपूर्ण नातेसंबंध
जर तुम्ही एका निराशाजनक नातेसंबधात आहात. ज्यात आनंदापेक्षा स्ट्रेसच असेल मानसन्मान नसेल तर असे नात्यातून बाहेर पडलेले बरे. कारण अशा नात्यामुळे हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस , डिप्रेशन सारखे आजार होण्याचीच शक्यता अधिक असते.

 

 

- Advertisment -

Manini