घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : माझी उपमा सार्थ ठरवण्याचा उद्धव ठाकरेंकडून आटोकाट प्रयत्न; फडणवीसांचा...

Devendra Fadnavis : माझी उपमा सार्थ ठरवण्याचा उद्धव ठाकरेंकडून आटोकाट प्रयत्न; फडणवीसांचा टोला

Subscribe

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राज्यात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करत असून ते जनसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून भाजपासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकास्त्र सोडताना दिसतात. देवेद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, असे वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी घणाघाती टीका केली होती. याचपार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, माझी उपमा सार्थ ठरवण्याचा उद्धव ठाकरेंकडून आटोकाट प्रयत्न सुरू आहे. (Devendra Fadnavis Desperate attempt by Uddhav Thackeray to justify my analogy)

हेही वाचा – Liquor Policy Case : केजरीवाल यांच्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार?

- Advertisement -

आज माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरे तुमच्यावर सातत्याने टीक करत आहेत, याकडे तुम्ही कसे बघता. यावर फडणवीस म्हणाले की, टोमणे बहाद्दर ही एकच उपमा मी उद्धव ठाकरे यांना दिली आहे आणि माझी उपमा कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करत आहेत. त्यांना आता असं वाटतंय की, देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला उपमा दिली आहे, तर सार्थ ठरवायलाच पाहिजे. त्यामुळे ते सातत्याने टोमणे मारत असतात आणि काहीतरी बोलत असतात, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंना माझं एकच म्हणणं आहे की, त्यांनी एक वाक्य विकासावर बोला. ही निवडणूक सामान्य माणासाला त्याच्या जीवानात परिवर्तन करणारे सरकार निवडून द्यायची आहे. त्यामुळे किमान एक तरी विकासाचं काम त्यांनी सांगाव. परंतु 25 वर्षांत संपूर्ण मुंबईत सांगू शकतील असा एकही प्रकल्प नाही. खरंतर ते विकासावर बोलूच शकत नाहीत. त्यामुळे मनोरंजन करणे आणि हेडलाइन मिळवणे याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : शेतकऱ्यांचं उत्पन्न अजूनही दुप्पट झालेलं नाही; शरद पवारांनी मोदी सरकारवर डागले टीकास्त्र

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सांगलीत जनतेशीही संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या “मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून आलो” या वक्तव्यावर निशाणा साधताना म्हटले होते की, दुसऱ्याच्या घरावरती दरोडा टाकायचा, दुसऱ्याच्या घरातले पैसे चोरायचे आणि वर सरळ सांगायचं बघा मी दोन घरं फोडून, मी श्रीमंत झालो. पण दुसऱ्याचे पैसे चोरून, दुसऱ्यांची संपत्ती चोरून, त्या संपत्तीवर नागोबासारखं बसलायत. तूम्ही कसले मर्द? तूम्ही कसले राजकारणी? अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -