घरमहाराष्ट्रPawar Vs Pawar : शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत...; रोहित पवारांचे...

Pawar Vs Pawar : शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत…; रोहित पवारांचे ‘दादां’ना खरमरीत पत्र

Subscribe

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना सोशल मीडियाद्वारे खरमरीत पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिले की, दादा (अजित पवार) आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा 'दादा' अद्यापही तसाच आहे असं मानून टी. राजा (भाजपचे तेलंगणा आमदार) यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती करत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हं कुणाचं याची सुनावणी होऊन निर्णय आयोगाकडे राखीव असला तरी राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांनी काका उपमुख्यमंत्री अजित पवारांना खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगत आहे. (Pawar Vs Pawar Alliance with reactionary forces except Sharad Pawar Rohit Pawars letter to Dadaan)

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना सोशल मीडियाद्वारे खरमरीत पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात लिहिले की, दादा (अजित पवार) आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा ‘दादा’ अद्यापही तसाच आहे असं मानून टी. राजा (भाजपचे तेलंगणा आमदार) यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती करत असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांच्या या पत्रानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार कशी दखल घेतात हे पहावे लागणार आहे.

- Advertisement -

पत्र लिहिण्यांचं नेमकं आताच कारण काय?

आमदार रोहित पवारांनी आज 30 जानेवारी रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर लिहिलेल्या पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांना उद्देशून पत्र लिहिले आहे. पत्राची सुरुवातच अजितदादा (उपमुख्यमंत्री अजित पवार) अशी केली आहे. त्यांनी लिहिले की, आपण (अजित पवार) नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतेच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली, परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही. असं म्हणत आमदार रोहित पवारांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीकास्त्र डागलं.

- Advertisement -

टी.राजा यांच्या कोल्हापूरमधील कार्यक्रमाला बंदी घाला

पुढे पोस्टमध्ये आमदार रोहित पवारांनी लिहिले की, वैचारिक प्रतिकारशक्तीमुळे कोल्हापुरात प्रतिगामी शक्तींना यश आलं नसल्याने याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी. राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलं आहे. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा असल्याचेही पोस्टमध्ये आमदार रोहित पवारांनी लिहित अजित पवारांपर्यंत कोल्हापूरकरांच्या भावना पोहोचविल्या आहेत.

हेही वाचा : SSC Exam 2024: दहावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट! ‘या’ तारखेपासून विद्यार्थ्यांना मिळणार Hall Ticket

पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणून…

राष्ट्रवादीत बंड करुन सत्तेत सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आठवण करुन देण्यासाठी आमदार रोहित पवारांनी पोस्टमध्ये लिहिले की, दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. शरद पवारांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा ‘दादा’ अद्यापही तसाच आहे असं मानून टी. राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल असे लिहित अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा : Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची – मनोज जरांगे

टी. राजांचं आक्षेपार्ह वक्तव्य, आणि दगडफेक

सोलापूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चानंतर भाजपचे आमदार टी. राजा यांनी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ते टी.राजा कोल्हापुरात येणार असल्याने आमदार रोहित पवारांनी हे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -