घरक्राइमCrime News: धक्कादायक! लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून केला खून; गाडीखाली चिरडून...

Crime News: धक्कादायक! लव्ह मॅरेजला मदत केली म्हणून केला खून; गाडीखाली चिरडून काढला काटा

Subscribe

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीच्या प्रेमविवाहाला मदत केली म्हणून तरुणाचा खून करण्यात आला आहे. चार वेळा या तरुणाच्या डोक्यावरून बोलेरो गाडी घालून आरोपीने त्याची हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीसांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे ज्या तरुणाचा खून करण्यात आला त्याचं पुढच्या आठवड्यात लग्न होतं. (Crime News Shocking Murdered for aiding a love marriage The fork was crushed under the car)

समोर आलेल्या माहितीनुसार, संभाजीनगरमधील शेंदूरवाडा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली असून पवन शिवराम लोढे ( वय 24 वर्षे) असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे. या तरुणाचं पुढच्या आठवड्यात लग्न होत. घरात लग्नाची तयारी केली जात होती.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात विवाह असल्याने मृत तरुण आपल्या वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला बाहेर गेला होता. यावेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली. विशेष म्हणजे तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या करण्यात आली.

संभाजीनगरच्या वाळुज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदूरवाडा- सावखेडा महामार्गावर ही घटना घडली. आरोपीच्या बहिणीचा प्रेमविवाह व्हावा, यासाठी मृत तरुणाने प्रयत्न केले होते. याच गोष्टीचा राग मनात धरुन ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -

मृत पवन हा शेतकरी असून त्याच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जाऊन विवाह केला होता. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती. याचाच राग मनात धरून संशयित आरोपींनी बोलेरोने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये पवन गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

(हेही वाचा: Loksabha 2024: यादीत नाव नाही; हेमंत गोडसे म्हणाले, नाशिकची निवडणूक शेवटच्या… )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -