घरदेश-विदेशPakistani Woman : सीमा हैदरनंतर आणखी एक पाकिस्तानी तरुणी बनणार भारताची सून

Pakistani Woman : सीमा हैदरनंतर आणखी एक पाकिस्तानी तरुणी बनणार भारताची सून

Subscribe

आणखी एक पाकिस्तानची तरुणी ही भारताची सून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या 21 वर्षीय जवेरिया खानुम हिचे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील रहिवासी असणाऱ्या समीर खानसोबत लग्न होणार आहे.

नवी दिल्ली : प्रेमासाठी माणूस सात समुद्र देखील पार करतो, असे आपण अनेकदा ऐकले आहे. परंतु, गेल्या काही महिन्यात प्रेमासाठी भारतातून पकिस्तानात जाण्याच्या आणि पाकिस्तानातून भारतात येण्याच्या घटना घडल्या आहेत. पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील तरुण सचिन या दोघांच्या प्रेम प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. सीमा हैदर ही आपल्या तीन मुलांसह सचिनसाठी भारतात आली. तिने तिच्या पाकिस्तानातील नवऱ्याला सचिनसाठी सोडून दिले. सीमा भारतात आल्यानंतर तिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या. ती पाकिस्तानची खबरी असल्याचेही सांगितले गेले. या घटनेच्या काही दिवसांतच भारतातील अंजू ही तिच्या पाकिस्तानात राहणाऱ्या नसरुल्लाह नावाच्या प्रियकरासाठी पळून गेल्याची बातमी समोर आली. या दोन्ही प्रकरणानंतर आता आणखी एक पाकिस्तानची तरुणी ही भारताची सून होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या 21 वर्षीय जवेरिया खानुम हिचे पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील रहिवासी असणाऱ्या समीर खानसोबत लग्न होणार आहे. (Pakistani Woman: After Seema Haider, another Pakistani girl will become the daughter-in-law of India)

हेही वाचा – Pakistanची जवेरिया खानम होणार भारताची सून

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल येथे राहणाऱ्या समीर खान आणि पाकिस्तानात राहणारी जवेरिया खानुम यांचे पुढील महिन्यात जानेवारीमध्ये लग्न होणार आहे. पण आता ती 45 दिवसांच्या व्हिसावर भारतातील तिच्या सासरी आली आहे. वाघा सीमेवरून जवेरिया हिने भारतात प्रवेश केला. यावेळी तिचा होणारा नवरा समीर खान आणि भावी सासरे अहमद कमाल खान युसुफजाई यांनी ढोल वाजवून तिचे जल्लोषात स्वागत केले. भारतात आल्यानंतर या दोघांनी भारत सरकारचे आभार मानले. मी भारत सरकारचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानू इच्छित आहे. हेतू शुद्ध असला की सीमारेषाही निरर्थक ठरते, असे समीरकडून सांगण्यात आले.

समीरसोबतच जवेरियाने देखील प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की, मला 45 दिवसांचा व्हिसा मंजूर झाला आहे. भारतात आल्यावर मला खूप आनंद झाला. इथे येताच मला खूप प्रेम मिळत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आमचे लग्न पार पडेल. मला पाच वर्षांनी व्हिसा मिळाला आहे. यावर माझा विश्वासच बसत नाही. तर हे सर्व मे 2018 मध्ये सुरू झाले. त्यावेळी मी जर्मनीहून घरी परतलो होतो. तिथे मी शिक्षणासाठी गेलो होतो. घरी आल्यानंतर मी माझ्या आईच्या फोनवर जवेरियाचा फोटो पाहिला आणि ती मला आवडत असल्याची इच्छा व्यक्त केली. तसेच मी माझ्या आईला सांगितले की मला जवेरियाशी लग्न करायचे आहे. त्यानंतर आमच्यातील नात्याला सुरुवात झाली, अशी माहिती समीर खान या तरुणाने दिली आहे. जवेरिया खानुमने याआधी दोन वेळा व्हिसासाठी अर्ज केला होता, परंतु भारत सरकारने दोन्ही वेळा तो नाकारला. त्यानंतर, जगभर पसरलेल्या कोविड संसर्गामुळे तिला भारतात येण्यासाठी तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली असल्याचे सांगण्यात आले आहे. तर लग्न झाल्यानंतर जवेरिया ही दिर्घकालीन व्हिसासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -