घरक्राइमलव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज... कोणत्या नात्यात सर्वाधिक काडीमोड?

लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज… कोणत्या नात्यात सर्वाधिक काडीमोड?

Subscribe

ज्या जोडप्यांकडून कौटुंबिक कलहाची तक्रार करण्यात येत आहे. त्यांचे अरेंज मॅरेज झालेले आहेत. शहरामध्ये 10 तक्रारींपैकी 7 कौटुंबिक कलहाच्या 7 तक्रारी या अरेंज मॅरेज झालेल्या दाम्पत्याकडून करण्यात येत आहेत.

मुंबई : लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे होत असले तरी यामुळे दोन कुटुंबामध्ये नाते जोडले जाते असे बोलण्यात येते. हल्लीची तरुण पिढी ही स्वतःच स्वतःच्या जोडीदाराची निवड करत असते. खूप कमी लोक असे आहेत, जे घरच्यांच्या पसंतीने लग्न करतात. परंतु अरेंज मॅरेज पद्धतीबद्दल एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्या जोडप्यांकडून कौटुंबिक कलहाची तक्रार करण्यात येत आहे. त्यांचे अरेंज मॅरेज झालेले आहेत. शहरामध्ये 10 तक्रारींपैकी 7 कौटुंबिक कलहाच्या 7 तक्रारी या अरेंज मॅरेज झालेल्या दाम्पत्याकडून करण्यात येत आहेत. गेल्या 4 वर्षांमध्ये कौटुंबिक वादाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. भरोसा सेलकडे प्राप्त तक्रारीनुसार 2020 मध्ये 2069 वादाची प्रकरणे घडली होती. तीच आता 2023 च्या एप्रिल पर्यंत 552 कौटुंबिक वाद पोलिसांपर्यंत पोहोचले आहेत. (Love marriage or arranged marriage… which relationship has the most divorces?)

हेही वाचा – Kapil Patil : आधार-पॅन लिंक दंडातून सर्वसामान्यांची सुटका करा; पाटीलांचे सीतारामनना पत्र

- Advertisement -

महिला, अल्पवयीन मुलांसह कौटुंबिक वादाच्या प्रकरणांवर तोडगा काढण्यासाठी भरोसा सेलची स्थापना करण्यात आली. पूर्वी प्रेम विवाहानंतर वादाच्या तक्रारीचे प्रमाण अधिक होते. मात्र, मागील चार वर्षांमध्ये कौटुंबिक वादात आता प्रामुख्याने अरेंज मॅरेजमधील जोडप्यांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती प्राप्त तक्रारींच्या अहवालातून समोर आली आहे. सध्या कुटुंबाच्या संगमतीने केलेल्या विवाहामध्ये समस्या अधिक आहेत. तडजोडीसाठी प्रयत्न केला जातो. परंतु, किरकोळ कारणातून वाद सुरू होतात आणि हे वाद थेट काडीमोड घेण्यापर्यंत येतात. सामूहिक कुटुंब पद्धती मुलींना नकोशी झाली असल्याचे पोलिसांच्या निष्कर्षातून समोर आले आहे. तसेच, शहरात तिशीच्या आतील वयोगटातील लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचे प्रमाण आणि तक्रारी देखील वाढल्याची माहिती महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस निरीक्षक तायडे यांच्याकडून देण्यात आली आहे.

या कारणांमुळे कुटुंबात होतोय वाद…

कुटुंबातील विसंवाद, संयुक्त कुटुंबात राहण्यास देण्यात येणारा नकार, प्रायव्हसी, एकमेकांचा स्पेस जपण्याचा हट्ट, माहेरच्यांचा नाहक हस्तक्षेप, पती-पत्नीचे मोबाईलवर अधिक वेळ व्यस्त राहणे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लग्नानंतर एकमेकांचा स्वभाव कळायला लागल्यावर त्यामुळे होणारे वाद या सर्व कारणांमुळे कौटुंबिक कलह वाढले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासोबतच 2 टक्के तक्रारी या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांकडून देखील करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार, वर्ष 2020 मध्ये 1472 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यांतील 579 प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला. यांतील 158 प्रकरणे कोर्टात, पोलीस ठाण्यात 183 प्रकरणे वर्ग करण्यात आलेली आहेत. वर्ष 2021 मध्ये 2069 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यांतील 673 प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला. यांतील 112 प्रकरणे कोर्टात, पोलीस ठाण्यात 541 प्रकरणे वर्ग करण्यात आलेली आहेत. तसेच 166 प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. वर्ष 2022 मध्ये 2226 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यांतील 577 प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला. यांतील 04 प्रकरणे कोर्टात आणि पोलीस ठाण्यात 175 प्रकरणे वर्ग करण्यात आलेली आहेत. तसेच 653 प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे. यावर्षी 2023 मध्ये एप्रिल महिन्यापर्यंत 552 तक्रारी दाखल करण्यात आल्या असून यांतील 102 प्रकरणांवर तोडगा काढण्यात आला. तर एकही प्रकरण कोर्टात वर्ग करण्यात आलेले नाही. 54 प्रकरणे ही पोलीस ठाण्यात असून 448 प्रकरणांची चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -