घरताज्या घडामोडीMumbai Climate: मुंबईत उष्णतेची लाट, सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद

Mumbai Climate: मुंबईत उष्णतेची लाट, सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद

Subscribe

जून महिना संपत आला तरी पावसाने आपलं रौद्र रुप धारण केलेलं नाहीये. मे महिन्यात ज्याप्रमाणे उकाडा होता. त्याचप्रमाणे जून महिन्यातही उकाडा लागत आहे. महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. परंतु मुंबईत उष्णतेची लाट कायम आहे. मुंबईमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

कुलाबा येथे 34.4 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 34.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान दोन्ही केंद्रावर सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक आहे. गुरूवारी तापमान 35 अंशांच्या पार नसूनही उकाड्याची जाणीव अधिक होती. दिवसभरात पश्चिमेकडून वारे वाहत होते. तर संध्याकाळच्या सुमारास आर्द्रता मात्र कमी होती. कुलाबा येथे 63 तर सांताक्रूझ येथे 59 टक्के आर्द्रतेची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

चक्रीवादळामुळे कोकणातील तापमान वाढले आहे. अलिबागमध्ये 35.6 अंश म्हणजे सरासरीपेक्षा 4.3 अंश अधिक तापमान नोंदले गेले आहे. गुरुवारी बंगालच्या उपसागरातील मान्सून शाखेचा प्रवास पुढे सुरू झाला. मात्र अरबी समुद्रातील शाखा अजूनही पुढे सरकलेली नाही. त्यामुळे कोकणातील उकाडा कायम आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कोकणासाठी उष्णतेच्या लाटेच्या इशाऱ्यांची संख्या अधिक होती, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. तर मार्चमध्ये सहा दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला होता.

- Advertisement -


हेही वाचा : Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उद्यापासून धो धो बरसणार, उकाड्यापासून मिळणार दिलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -