घरमनोरंजनमी मृत्यूच्या जबड्यातून आलो... ‘स्वतंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होताच रणदीपचा खुलासा

मी मृत्यूच्या जबड्यातून आलो… ‘स्वतंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होताच रणदीपचा खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा सध्या त्याच्या आगामी ‘स्वतंत्र्यावीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. 28 मे रोजी वीर सावरकरांच्या जयंती निमित्त या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचा जबरदस्त टीझर पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले होते. या चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित यांनी केली असून या चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप हुड्डा दिग्दर्शक म्हणून देखील पदार्पण करत आहेत. दरम्यान, अशातच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी समोर आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

रणदीप हुड्डाने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. शिवाय त्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त करत लिहिलंय की, “स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे शूटिंग करत असताना मी मृत्यूच्या जबड्यातून परत आलो आहे. त्याबद्दल दुसर्‍या दिवशी बोलेन. सध्या मी माझ्या टीमचा मनापासून आभारी आहे. तसेच मी कलाकारांचे आभार मानू इच्छितो. मी कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी माझ्यासोबत रात्रंदिवस काम केले आणि हा चित्रपट बनवण्यात यश मिळवले.”

- Advertisement -

पुढे रणदीप हुड्डाने लिहिलंय की, “शेवटी, आता मी नीट खाऊ शकतो. मी चांगले खाण्यासाठी उत्सुक आहे. या संपूर्ण शूटमध्ये मी काय खाल्ले, काय खाल्ले नाही याचा अंदाज अनेकजण लावत होते. त्यामुळे मी लवकरच याबद्दल बोलेन. वंदे मातरम. स्वातंत्र्यवीर सावरकर. शूटिंग पूर्ण झाले. धन्यवाद.” असं रणदीप म्हणाला.

- Advertisement -

दरम्यान, याआधी या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र, तारखा न जुळल्याने त्यांनी नकार दिला. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रणदीपने केलं. संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी ‘स्वातंत्र्यावीर सावरकर’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि लिजेंड स्टुडिओज द्वारे ‘स्वातंत्र्यावीर सावरकर’ चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. यंदा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

‘आदिपुरुष’च्या कमाईत घसरण; सहाव्या दिवशी कमावले केवळ ‘इतके’ कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -