Thursday, May 2, 2024
घरमानिनीRelationship'या' सवयींमुळे तुटते मैत्री, तुम्ही तर नाही करत ना या गोष्टी

‘या’ सवयींमुळे तुटते मैत्री, तुम्ही तर नाही करत ना या गोष्टी

Subscribe

मैत्रीचे नाते प्रत्येकासाठी खास असते. मित्र तेच असतात ज्यांना तुम्ही तुमच्या मनातील सर्वकाही अगदी बिंनधास्त शेअर करता. प्रत्येकालाच मैत्रीच्या नात्यावर विश्वास असतो. मात्र काही मित्र-मैत्रीणींसाठी मर्यादा पाळल्या जातात. त्यांना सर्वकाही शेअर केले जात नाही. अशातच काही मित्र तुमच्यापासून दूर होऊ लागतात. अशातच अशा कोणत्या सवयी आहेत ज्या मैत्रीच्या नात्यात गैरसमज निर्माण करु शकतात हे पाहूयात. (Mistakes in friendship)

-तुमच्या मागे वाईट बोलणे

- Advertisement -


मैत्रीतील सर्वात पहिला नियम असतो की, मित्राच्या मागे त्याच्या बद्दलच वाईट बोलणे. जर तुम्हाला मित्राची एखादी सवय आवडत नसेल तर त्याला तोंडावर बोला. त्याच्या मागे बोलण्याची सवय सोडा. तुमच्या या सवयीमुळे मित्राला वाईट वाटू शकते.

-खोटं बोलणे

- Advertisement -


ऑफिस, कॉलेज किंवा घराच्या आसपास तुमचा एखादा मित्र आहे. मात्र त्याच्याशी तुम्ही खोटेपणाने वागत असाल तर तसे करु नका. जेव्हा त्या मित्राला तुमच्या खऱ्या स्वभावाबद्दल कळेल तेव्हा तो तुमच्यापासून दूरावला जाईल.

-मस्करी करणे


मित्रमैत्रणींमध्ये एकमेकांची मस्करी केली जाते. मात्र कधीकधी मस्करी ऐवढी केली जाते की, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाईल. मस्करी करताना पर्सनल कमेंट्स करणे सुद्धा चुकीचे आहे. तुमच्या या सवयीमुळे मित्र तुमच्यापासून दूर राहतील.

-फसवणे


जर तुम्हाला तुमचा मित्र सर्वकाही शेअर करत आहे तर ते तुमच्या पर्यंत मर्यादित ठेवा. कधीच मस्करीत किंवा मुद्दाम त्याच्या गोष्टी तिसऱ्याच्या कानापर्यंत पोहचू देऊ नका. तुमची ही सवय तुम्हाला मैत्रीच्या नात्यापासून दूर ठेवेल.


हेही वाचा- तुम्ही निगेटीव्ह लोकांच्या संपर्कात आहात का? असे ओळखा

- Advertisment -

Manini