घरदेश-विदेशInternational News:11 लाख रुपये खर्चून गेले होते रशियात; आता यूक्रेनविरुद्ध लढण्यासाठी पाठवले

International News:11 लाख रुपये खर्चून गेले होते रशियात; आता यूक्रेनविरुद्ध लढण्यासाठी पाठवले

Subscribe

नवी दिल्ली: हरियाणा-पंजाबमधील 7 मुले रशियामध्ये फिरण्यासाठी गेले होते. परंतु त्यांची फसवणूक करून त्यांना युक्रेनशी युद्धव लढण्यासाठी काही लोक घेऊन गेले. आता पंजाब आणि हरियाणातील या 7 तरुणांच्या गटाने भारत सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्यांची फसवणूक केली जात आहे आणि रशिया-युक्रेन युद्ध लढण्यास भाग पाडले जात असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी X वर 105 सेकंदाचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लष्कराचे कपडे घातलेली सात मुले बंद खोलीत दिसत आहेत. यातील गर्श नावाचा मुलगा हरियाणातील कर्नाल येथील रहिवासी आहे. तो एक व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे आणि तिथल्या परिस्थितीचे वर्णन करत आहे आणि भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहे. (International News 11 lakh rupees were spent in Russia Now made into a soldier and sent to war with Ukraine)

रशिया-युक्रेन युद्धात 7 भारतीय मुले अडकली

एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सर्व मुले 27 डिसेंबर रोजी नवीन वर्ष साजरे करण्यासाठी रशियाला रवाना झाली होती.त्यांच्याकडे रशियाला जाण्यासाठी 90 दिवसांचा वैध व्हिसा होता. त्यानंतर एजंट त्यांना बेलारूसला घेऊन गेला. बेलारूसला जाण्यासाठी व्हिसा लागेल हे माहीत नव्हते, असे या मुलांचे म्हणणे आहे. व्हिसाशिवाय ही मुलं बेलारूसला पोहोचताच एजंटने त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना तिथेच सोडले. यानंतर पोलिसांनी या सात मुलांना पकडून अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. हा व्हिडीओ बनवणाऱ्या हर्षने दावा केला की, त्याला कागदपत्रांवर सही करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली होती. आता रशिया त्यांना युक्रेनविरुद्ध युद्ध करण्यास भाग पाडत आहे.

- Advertisement -

कामाच्या शोधात रशियाला गेला, आता युद्ध करण्यास भाग पाडले

हर्षच्या कुटुंबीयांनी खासगी वृत्तवाहिनीला सांगितले की, त्यांचा मुलगा रोजगाराच्या शोधात परदेशात गेला होता आणि रशियामार्गे गेल्यास त्याला त्याच्या आवडीच्या देशात राहणे सोपे जाईल असे त्याला सांगण्यात आले. हर्षच्या आईने सांगितले की, “आमचा मुलगा 23 डिसेंबर रोजी कामाच्या शोधात परदेशात गेला होता आणि त्याला रशियात पकडण्यात आले आणि त्याचा पासपोर्ट काढून घेण्यात आला. त्याने आम्हाला सांगितले की, त्याला रशियन सैनिकांनी पकडले होते, ज्यांनी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची धमकी दिली होती आणि त्याला सैन्यात भरती करण्यात आले. हर्षला लष्करी प्रशिक्षण घेणे भाग पडले.” आता हर्षची आई आपल्या मुलाला सुखरूप परत आणण्यासाठी भारत सरकारकडे याचना करत आहे. हर्षच्या भावाचा दावा आहे की, त्याला शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले आणि डोनेस्तक परिसरात तैनात करण्यात आले. ते म्हणाले, ‘‘आता तो जिवंत असेल की नाही हे सांगणे कठीण आहे.’’ भावाला देशात परत आणण्याचे आवाहनही त्यांनी सरकारला केले. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव गुरप्रीत सिंग असल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्या कुटुंबीयांनीही सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.

रशियन सैन्यात सक्तीची भरती

गुरप्रीत सिंगचा भाऊ अमृत सिंग याने सांगितले की, त्यांना सैन्यात भरती होण्यास भाग पाडले गेले. त्याने दावा केला, “बेलारूसमध्ये या सात जणांनी ज्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली ते रशियन भाषेत होते, त्यानंतर त्याला जबरदस्तीने तेथे सैन्यात भरती करण्यात आले. या मुलांना एकतर 10 वर्षांची शिक्षा भोगावी किंवा रशियन सैन्यात सहभागी व्हावं लागेल. राजकीय आणि आर्थिक पाठबळासाठी रशियावर अवलंबून असलेला बेलारूस हा रशियाचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो. क्रेमलिनने युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी आपला प्रदेश एक स्टेजिंग ग्राउंड म्हणून वापरला. तेव्हापासून, वारंवार संयुक्त लष्करी सरावामुळे चिंता वाढली आहे.

- Advertisement -

रशियात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न

व्हिडिओमध्ये दिसणारी सात मुले रशियामध्ये अडकलेल्या दोन डझन लोकांपैकी आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांची फसवणूक करून सैन्यात सामील करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ते जम्मू आणि काश्मीरमधील 31 वर्षीय आझाद युसूफ कुमारसह अडकलेल्या लोकांच्या संपर्कात आहेत. त्याच्या भरतीनंतर काही दिवसांनी, युसूफ कुमारला युद्धादरम्यान पायात गोळी लागल्याचा आरोप आहे. असेही वृत्त आहे की कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे 10 लोक अशाच गंभीर परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना सुरक्षा रक्षक किंवा मजूर असल्याच्या बहाण्याने रशियाला पाठवण्यात आले; फसवणूक करणाऱ्या एजंटने त्यांच्याकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेतले. युक्रेन-रशिया युद्धात काही भारतीय अडकल्याची माहिती मिळाल्याचे सरकारने गेल्या महिन्यात म्हटले होते. मॉस्कोमधून त्यांच्या सुटकेसाठी सरकार वाटाघाटी करत आहे.

(हेही वाचा: Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरुन भांडण, आजच्या बैठकीला ‘वंचित’ राहणार गैरहजर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -