घरमुंबईGokhale Bridge : रेल्वेने सांगितले तसेच केले..., गोखले पुलाबाबत मुंबई महापालिकेने दिले...

Gokhale Bridge : रेल्वेने सांगितले तसेच केले…, गोखले पुलाबाबत मुंबई महापालिकेने दिले कारण

Subscribe

मुंबई : अंधेरी येथील गोखले पुलावरून सध्या मुंबई महापालिकेला लक्ष्य केले जात आहे. या पुलाचे पोहोच रस्ते उंच झाले असून बर्फीवाला पुलाच्या दिशेने तीव्र उतार तयार झाला आहे. याबाबर मुंबई महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडे बोट दाखविले आहे. रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार आम्ही हे काम केल्याचे पालिकेने म्हटले आहे. मात्र, बांधकामाच्या नियोजनासाठी रेल्वेसोबत पालिकेची याआधी बैठक झाली नाही का, असा सवाल मुंबईकरांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – Sambhajinagar : ‘…म्हणून तुमच्या ‘दुचाकी’ कॅबिनेटची आग झाली’, दानवेंचा फडणवीसांवर पलटवार

- Advertisement -

मुंबईत 3 जुलै 2018 रोजी अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचा काही भाग कोसळून दोन जणांचा बळी गेला होता. या पुलाच्या दुरुस्तीचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले होते. या पुलाच्या पुनर्बांधणीचे कार्यादेश 20 एप्रिल 2020 रोजी देण्यात आले. तर पुलाच्या पुनर्बांधणीचे काम 15 मार्च 2021 रोजी सुरू झाले. तर, आता या पुलाची पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारी एक मार्गिका मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते 26 फेब्रुवारीपासून खुली करण्यात आली. त्यानंतर या पुलाच्या उंचीबाबतच्या त्रुटी समोर आल्या आणि पालिकेवर टीका होऊ लागली. आता मुंबई महापालिका, रेल्वे प्राधिकरण, सल्लागार यांच्यासोबत सातत्याने बैठका घेऊन बर्फीवाला पूल हा गोखले पुलासोबत जोडण्यासाठी अनेक पर्यायांवर विचारमंथन करण्यात येत आहे. बर्फीवाला पूल आणि नवीन गोखले पूल यामध्ये सुमारे दीड मीटर उंचीचे अंतर आहे.

या समस्येतून मार्ग काढण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय) संस्थेची मदत घेण्यात येत आहे. पुलाच्या ठिकाणी व्हीजेटीआयच्या सल्लागारांनी प्रकल्पस्थळी भेट दिली असून दोन्ही पूल जोडण्यासाठीची पद्धती त्यांच्याकडून सुचवले जाणे अपेक्षित असल्याचे पालिका प्रशासनाने म्हटले आहे. तथापि, पूलजोडणीसाठी बर्फीवाला पूल 50 मीटरपर्यंत तोडावा लागेल आणि त्यासाठी साधारणपणे 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Seat Sharing : महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाहांसोबत मध्यरात्री बैठक

मुंबई महापालिकेने गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम करताना रेल्वेमार्गावरील पुलाखाली किमान 6 मीटर इतकी ओव्हरहेड उंची ठेवण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसारच रेल्वे भागातील पुलाचे (रेल्वे ओव्हर ब्रीज) ओपन वेब गर्डरच्या आराखड्याचे काम पूर्ण करून मुंबई महापालिकेच्या वतीने रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने हा आराखडा 30 मे 2022 रोजी मंजूर केला. या आराखड्यात प्रत्यक्षात रेल्वे भागातील पुलाच्या 8.45 मीटरच्या उंचीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. परिणामी रेल्वे हद्दीतील पुलाची उंची वाढली. सद्यस्थितील रेल्वे भागातील पुलाची पातळी आणि बर्फीवाला जंक्शन येथे पुलाची पातळी यामध्ये दोन्ही पुलाच्या उंचीतील फरक हा 2.83 मीटर इतका आहे.

बर्फीवाला उड्डाणपूल हा गोखले पुलासोबत जोडण्यासाठी सद्यस्थितीला स्वामी विवेकानंद मार्ग आणि जुहू येथून अंधेरी स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्ग येथे दुरुस्ती किंवा अद्ययावतीकरणाच्या कामासाठी अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. गोखले पुलाच्या कामासोबतच जोडणीचे काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. परिणामी स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्ग येथे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नियोजित केल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील कामासोबतच दोन्ही पुलांच्या जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – UP Crime : लग्नासाठी केले ऑपरेशन, पण प्रियकराने नकार दिल्याने रीटाने उचलले ‘हे’ पाऊल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -