Wednesday, May 1, 2024
घरमानिनीReligiousDream About Fish : तुम्हाला स्वप्नात मासे दिसतात का?

Dream About Fish : तुम्हाला स्वप्नात मासे दिसतात का?

Subscribe

दिवसभराच्या थकव्यानंतर शांत झोप ही प्रत्येकाला हवी असते. अशा स्थितीत अनेक जण झोपताच स्वप्नांच्या दुनियेत पोहोचतात. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात. यातील काही स्वप्ने आनंददायी असतात, तर काही इतकी भयानक असतात प्रत्येक स्वप्न तुम्हाला भविष्यातील काही घटना सूचित करत असतात.पण स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर ते खूप शुभ असते. स्वप्नशास्त्रात असे सांगितले आहे की, स्वप्नात मासे दिसणे हे एक अतिशय महत्त्वाचे लक्षण आहे.स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर ते शुभ संकेत मानले जाते. हिंदू धर्मात माशाचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे. चला जाणून घेऊया स्वप्नात मासे पाहण्याचा नेमका अर्थ काय आहे.

स्वप्नात मासा दिसणे :

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासा दिसला तर, त्याच्या आगामी काळात काही शुभ कार्य घडणार आहे असे संकेत दिसतात. कारण मासे हे महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जर स्वप्नात मोठा मासा दिसला तर त्याचा अर्थ माता लक्ष्मीची तुमच्यावर खूप कृपा होणार आहे. भविष्यात त्याला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.

- Advertisement -

स्वप्नात डॉल्फिन मासा दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात डॉल्फिन मासा दिसणे हे शुभ लक्षण आहे. म्हणजे येणाऱ्या काळात तुमचे नशीब उजळणार आहे. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात लहान रंगीबेरंगी मासे दिसले तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला आगामी काळात मोठे यश मिळणार आहे.

स्वप्नात रंगीबेरंगी मासे दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार,जर तुम्हाला स्वप्नात वेगवेगळ्या रंगांचे मासे दिसले तर समजा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संपणार आहे. सुख आणि सौभाग्य घरामध्ये दार ठोठावणार आहे. यासोबतच दीर्घकाळ चालणाऱ्या आजारापासूनही सुटका मिळेल.

- Advertisement -

स्वप्नात पोहणारे मासे दिसणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात मासे पोहताना दिसले तर समजून घ्या तुमच्या आयुष्यातही चांगले दिवस येणार आहेत. सुख-समृद्धी, धन-संपत्ती मिळू शकते. व्यवसाय आणि नोकरीतही काही चांगली बातमी मिळू शकते. मुलांकडूनही आनंद मिळू शकतो.

स्वप्नात माशांना खायला देणे :

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वत:ला नदी, तलाव किंवा समुद्राच्या काठावर बसून माशांना खाऊ घालताना दिसले तर सुख-समृद्धीसोबतच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल, असा विश्वास ठेवा.

स्वप्नात शार्क दिसणे :

जर एखाद्याला स्वप्नात शार्क मासे दिसले तर ते त्याच्यासाठी अशुभ चिन्ह असू शकते. म्हणजे येणाऱ्या काळात त्या व्यक्तीला काही संकटांना सामोरे जावे लागू शकते. अन्यथा ती व्यक्ती कर्जात अडकू शकते.

स्वप्नात मृत मासा दिसणे

जर एखाद्याला स्वप्नात मृत मासा दिसला तर याचा अर्थ असा आहे की आगामी काळात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.

- Advertisment -

Manini