घरट्रेंडिंगAstro Tips : 'व्हॅलेंटाईन डे' ला आपल्या राशीनुसार घाला 'या' रंगाचे कपडे,...

Astro Tips : ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आपल्या राशीनुसार घाला ‘या’ रंगाचे कपडे, मनासारखा जाईल दिवस

Subscribe

आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही चांगले कपडे घालू शकता आणि ते ही तुमच्या राशीनुसार जेणेकरुन प्रेमाच्या समुद्रात तुमची नाव अलगद तरंगू शकेल. त्यामुळे तुम्ही जर आज व्हॅलेंटाईन डे दिवशी नव्या नात्याची सुरुवात करत आहात तर तुमच्या राशीनुसार योग्य रंगाचे कपडे नक्की परिधान करुन जा.

Valentine’s Day Astro Tips : आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमी युगुलांसाठीचा खास दिवस. आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण तरुणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु तुमचा हा दिवस कसा जाईल हे काही सांगता येत नाही. कदातिच तुम्हाला आवडणारी व्यक्ती तुमचे प्रपोजल स्वीकारेल किंवा रिजेक्ट ही करेल. त्यामुळे प्रत्येकाला आपला आजचा दिवस ठिक ठाक तरी जावा असे वाटत असते. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी तुम्ही चांगले कपडे घालू शकता आणि ते ही तुमच्या राशीनुसार जेणेकरुन प्रेमाच्या समुद्रात तुमची नाव अलगद तरंगू शकेल. त्यामुळे तुम्ही जर आज व्हॅलेंटाईन डे दिवशी नव्या नात्याची सुरुवात करत आहात तर तुमच्या राशीनुसार योग्य रंगाचे कपडे नक्की परिधान करुन जा. रंगाचा आपल्या आयुष्यात आणि व्यक्तिमत्त्वात फार महत्त्वाचा प्रभाव पडतो. रंगावरुन तुमचा मूड आणि तुमच्यातील ऊर्जा दिसून येते. चला तर जाणून घ्या आज व्हॅलेंटाऊन डे दिवशी कोणत्या राशीच्या लोकांनी कोणते कपडे परिधान करावे.

मेष – या राशीचा स्वामी आज मंगळात आहे आणि मंगळाचा रंगा लाल आहे. लाल रंग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. या रंगाने तुम्हाला मंगळाचे बळ मिळेल आणि दिवस चांगला जाईल.

- Advertisement -

वृषभ – वृषभ राशीचा स्वामी आज शुक्र असून शुक्राचा आवडता रंग हा सफेद आहे. आज वृषभ राशीच्या लोकांनी सफेद रंगाचे कपडे परिधान करावे. आज सफेद कपडे परिधान केल्यास राशीच्या स्वामीची मदत तुम्हाला मिळेल. हा रंग तुमच्या आयुष्याला आकर्षक बनवेल.

मिथुन – मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. ज्योतिषात बुधाला युवराज मानले जाते. या राशीच्या लोकांनी हलक्या रंगाचे कपडे परिधान करावे. तकड फडक रंगाच्या कपड्यांपासून दूर राहा. लाईट रंगाच्या कपड्यांनी रोमँटिक मूड तयार होईल.

- Advertisement -

कर्क – कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्राला सफेद रंग प्रिय आहे. चंद्राची कोणासोबत दुश्मनी नसते. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांनी आज सफेद रंगाचे वस्त्र परिधान करावे.

सिंह – सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी आज लाल, केशरी, मरुन, गोल्डन या रंगाचे वस्र परिधान करावे. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जे काम करायला जाल ते सफल होईल.

कन्या – कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या राशीच्या लोकांनी गुलाबी, हिरवा, नारंगी रंगाचे कपडे परिधान करावे.

तुळ – तुळ राशीचा स्वामी शुक्र असून या साशीच्या लोकांनी सफेद किंवा सिल्वर रंगाचे कपडे परिधान करावेत. यामुळे तुम्ही प्रेम करत असलेली व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल.

वृश्चिक – तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे आज तुम्ही केशरी, लाल रंगाचे कपडे परिधान करा. ज्यामुळे तुम्हाला हिंमत आणि ऊर्जा मिळेल.

धनु – धनु राशीचा स्वामी गुरू आहे. गुरूला पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रिय आहेत. आज तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. यात तुमचे सौंदर्य खुलून येईल आणि समोरचा व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल.

मकर – तुमच्या राशीचा स्वामी शनि आहे. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी आज काळे कपडे परिधान करावे.

कुंभ – कुंभ राशीचा स्वामी देखील शनि आहे. परंतु कुंभ राशीच्या लोकांनी आज निळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. याने तुमचे भाग्य प्रबल होईल.

मीन – मीन राशीचा स्वामी गुरू आहे. त्यामुळे आज मीन राशीच्या लोकांनी पिवळा, ग्रे या रंगाचे कपडे परिधान करावे.

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -